सन १९९५ च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात शहरात २३ जानेवारी १९९५ रोजी शिवसेनेचे उमेदवार राजेश पाटील राऊत यांच्या प्रचारार्थ स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली होती. विशेष म्हणजे या दिवशी स्व. ठाकरे यांचा वाढदिवस होता. यावेळी बिरबलनाथ मंडळ व शिवसैनिकांनी मंगरूळपीर शहराचे नामकरण मंगरूळनाथ असे करण्याची मागणी केली होती. शहराचे आराध्यदैवत असलेले संत बिरबलनाथ महाराज यांनी जिवंत समाधी या ठिकाणी घेतल्याने त्यांचे नाव शहराला द्यावे अशी मागणी होती. त्यावर लगेच स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर सभेत मंगरूळनाथ म्हणून घोषणा केली होती. त्यामुळे बाळासाहेबांनी स्वतः केलेल्या या घोषणेची पूर्तता आता मुख्यमंत्री असलेले त्यांचे पुत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार का, असा विषय चर्चिल्या जात आहे.
मंगरूळपीरचे मंगरूळनाथ नामकरणाबाबत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:10 IST