शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये शालेय विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 13:37 IST

वाशिम : संयुक्त राष्ट्र संघाच्या घोषणेनुसार राज्य व जिल्हास्तरावर १३ आॅक्टोंबर हा दिवस आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : संयुक्त राष्ट्र संघाच्या घोषणेनुसार राज्य व जिल्हास्तरावर १३ आॅक्टोंबर हा दिवस आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ११ ते १८ आॅक्टोंबरदरम्यान जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन आठवडा साजरा केला जात असून १३ आॅक्टोंबरला वाशिममधील श्री बाकलीवाल विद्यालयात विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले.आपत्ती व्यवस्थापन आठवडा कालावधीत जिल्ह्यातील शाळांमध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य आदी कार्यक्रम घेण्याचे शासनाचे निर्देश आहेत. यासह मोबाईल व्हॅन, प्रदर्शन, आपत्ती व्यवस्थापन रंगीत तालीम (मॉक ड्रील), सभा, मुद्रित साहित्य, बॅनर, डॉक्युमेंटरी, चित्रफित आदिंच्या माध्यमातूनही जनजागृती आणि शासनाचे आपत्ती व्यवस्थापन धोरण, क्षमता बांधणीचे उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. दरम्यान, या उपक्रमांतर्गत वाशिमच्या श्री बाकलीवाल विद्यालयात शनिवारी सकाळी संत गाडगेबाबा आपत्कालिन व शोध पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांनी पाण्यात बुडून जीव धोक्यात सापडल्यास काय करायला हवे अथवा पाण्यातील मृतदेह शोधण्यासाठी कुठल्या उपाययोजना करता येऊ शकतात, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा