शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
3
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
4
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
5
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
6
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
7
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
8
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
9
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
10
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
11
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
12
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
13
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
14
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा
15
वयाच्या ७० व्या वर्षी पिता बनला हा अभिनेता, पत्नीसह केलं आठव्या मुलाचं स्वागत
16
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
17
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
18
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
19
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
20
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी

डिजिटल वर्ग खोल्यांची अंमलबजावणी रेंगाळली!

By admin | Updated: April 23, 2017 01:23 IST

वाशिम जिल्ह्यातील स्थिती; शिक्षणाधिका-यांचे शाळांना पत्र; साहित्य खरेदीबाबत संभ्रम.

वाशिम: सर्व शिक्षा अभियानातंर्गत २0१६-१७ या वर्षासाठी जिल्ह्यातील ४९ शाळांना प्रत्येकी तीन वर्गखोल्या डिजिटल करण्यासाठी निधी शिक्षण विभागाकडून मंजुर करण्यात आला; मात्र बहुतांश शाळांनी या संदर्भात ऑनलाइन माहिती सादर न केल्यामुळे उपरोक्त डिजिटल वर्गखोल्यांची प्रक्रिया अद्याप रेंगाळली आहे. सर्व शिक्षा अभियानात २0१६-१७ या वर्षाकरीता नवोपक्रम अंतर्गत संगणक शिक्षणासाठी मंजूर निधीतून शंभर टक्के वर्ग डिजिटल करण्यासाठी जिल्ह्यातील ४९ जि.प. उच्च प्राथमिक शाळांना निधी वितरित करण्यात आला. या निधिमधून संबंधित शाळेला तीन वर्ग खोल्या डिजिटल करावयाच्या आहेत. त्यासाठी प्रती वर्गखोली २८ हजार ६२७ प्रमाणे एकूण ८५ हजार ८२२ रुपयांचा निधी शाळांकडे वर्ग करण्यात आला, तसेच सदर निधीतून वर्ग खोली डिजिटल करण्यासाठी कोणते साहित्य वापरायचे त्याच्या सूचनाही सदर पत्रात नमूद करण्यात आल्या आहेत. यामध्ये ३२ इंची हायडेफिनेशन एलईडी डिस्प्ले, त्याशिवाय डिजिटल वर्गखोलीच्या वापरासाठी कशा प्रकारचा टॅबलेट घ्यायचा आणि त्याची क्षमता किती असावी, याचाही स्पष्ट उल्लेख पत्रात करण्यात आलेला आहे. त्याची तपासणी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषद मुंबई यांच्या तज्ज्ञांमार्फत ३१ मार्च २0१७ पर्यंतच करण्यात येणार होते. दरम्यान, साहित्य कोठून खरेदी करायचे, याबाबत मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समित्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे हि प्रक्रिया अद्यापही पूर्ण होऊ शकली नाही. शिक्षणाधिकार्‍यांच्यावतीने संबंधित मुख्याध्यापकांना त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हास्तरावर पुन्हा पुन्हा आमंत्रित केले; परंतु अद्यापही त्या मुख्याध्यापकांकडून प्रतिसाद लाभलेला नाही. त्यामुळे डिजिटल वर्गखोलीच्या साहित्याची खरेदी प्रलंबित आहे. आता येत्या दीड महिन्यात नव्या शैक्षणिक सत्राला सुरुवात होत असताना नवोपक्रमांतर्गत संगणक शिक्षणासाठी मंजूर निधीचा वापर होण्याची शक्यता राहिली नाही. सर्व शिक्षा अभियानात नवोप्रकमांतर्गत जिल्ह्यात ४९ शाळांतील प्रत्येकी तीन वर्ग खोल्या डिजिटल करण्यात येणार आहेत. यासाठी शासनाकडून निधीची तरतूदही झालेली आहे. वर्गखोल्या डिजिटल करण्यासाठी साहित्य खरेदीपासून ते ऑनलाइन माहिती सादर करण्यासाठी मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. यासाठी वारंवार सूचना करूनही काही शाळांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे ही प्रक्रिया रेंगाळली आहे. -दिनकर जुमनाके शिक्षणाधिकारी (प्राथ), जिल्हा परिषद, वाशिम