रक्तदाब, मधुमेह, दृष्टिदोष यांसह हृदय आणि यकृताच्या आजारांनी पोलीस दलातील अनेकांना ग्रासलेले आहे. विशेषत: रक्तात साखर वाढण्याचे आणि रक्तदाबाचे अधिक प्रमाण असल्याचे दिसून येत आहे. सततच्या आजारामुळे शारीरिक क्षमता कमी होण्यासह त्याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होतो. गुन्हेगारांना पकडणे किंवा तपास कार्य करीत असताना, यामुळे संबंधितांची चांगलीच दमछाक होते.
..............
वजन, उंचीचे मोजमाप
वाशिम शहरातील एका खासगी दवाखान्यात पोलीस कर्मचाऱ्यांचे वजन आणि उंचीचे मोजमाप केले जाते. तेथून एकत्रित अहवाल पोलीस प्रमुखांना पाठविला जातो. त्या आधारे फिटनेसचा देय भत्ता लागू केला जातो.
.................
कर्मचारी म्हणतात, जेवणालाही वेळ मिळत नाही...
दैनंदिन कामातून वेळ मिळत नसल्यामुळे आणि कामाच्या अधिक व्यापामुळे शरीर सुदृढ ठेवण्याकडे दुर्लक्ष होते. अनेकदा १८ तास ड्युटी करावी लागते. महत्त्वाची आंदोलने, राजकीय मेळावे, निवडणुका यामुळे सुट्ट्याही रद्द केल्या जातात. बंदोबस्त किंवा दैनंदिन कामही निश्चित नसते. त्यामुळे जेवणालाही वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत आरोग्यावर परिणाम होतो. एखाद्या प्रकरणातील तपासात रात्री उशिरापर्यंत जागरण करावे लागते, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
................
कसे राखणार आरोग्य?
वाशिम जिल्हा पोलीस दलामध्ये बहुतांश पोलीस अधिकारी व कर्मचारी शारीरिकदृष्ट्या ‘फिट’ आहेत. मात्र, त्यात सातत्य राखता येणे अनेकांना जमत नाही. कामाचा अधिक व्याप, रात्रीच्या सुमारास होणारे जागरण आणि जेवणाची वेळ अनिश्चित असणे आदी कारणांमुळे ही समस्या उद्भवत आहे.
.........................
कोट :
वाशिम जिल्हा पोलीस दलातील ८० टक्क्यांपेक्षा अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी शारीरिकदृष्ट्या फिट आहेत. काही कर्मचाऱ्यांची ढेरी पुढे येणे, काहींना विविध स्वरूपातील आजार जडले आहेत. मात्र, हे प्रमाण तुलनेने फारच कमी आहे. दर महिन्याला कर्मचाऱ्यांची फिटनेस टेस्ट घेतली जाते.
- वसंत परदेशी, जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम.