आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक; रास्ता रोकोचा इशारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 06:02 PM2018-08-10T18:02:10+5:302018-08-10T18:02:37+5:30

मालेगाव : आरक्षणासाठी मराठा समाजाने केलेल्या आंदोलनाची धग अद्याप कायम असतानाच आता आता धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे.

Dhangar society aggressive for reservation; Road stop | आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक; रास्ता रोकोचा इशारा 

आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक; रास्ता रोकोचा इशारा 

Next


लोकमत न्यूज नेटवर्क 
मालेगाव : आरक्षणासाठी मराठा समाजाने केलेल्या आंदोलनाची धग अद्याप कायम असतानाच आता आता धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. गेल्या ४ वर्षांपासून आरक्षणाबाबत केवळ आश्वासन देणाºया शासनाचे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा पावित्रा आता धनगर आरक्षण कृती समितीने घेतला आहे. या संदर्भात संघटनेच्या मालेगाव शाखेने १० आॅगस्ट रोजी मालेगावच्या तहसीलदारांसह शिरपूरच्या पोलीस निरीक्षकांनाही निवेदन सादर केले आहे. 
मुख्यमंत्री देवेन्द फडणवीस यांनी भाजप सत्तेवर नसताना ४ वर्षांपूर्वी बारामती येथे धनगर समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात उपस्थिती लावली होती. यावेळी समाजबांधवांना संबोधित करताना आमच्याकडे सत्ता आल्यास मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत ठाम निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यानंतर राज्यात भाजपचही सत्ता स्थापन झाली परंतु बारामतीच्या मेळाव्यात धनगर समाज बांधवांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता यांनी अद्यापही केली नाही. त्यांना त्यांच्या आश्वासनाचे स्मरण करून देण्यासह आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी धनगर समाज संघटनांच्यावतीने वेळोवेळी निवेदने सादर करण्यात आली आणि आंदोलनही केले; परंतु त्याचीही दखल घेण्यात आली नाही. या प्रकारामुळे धनगर समाज बांधवांत रोषाचे वातावरण निर्माण झाले असून, आरक्षणासह धनगर समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत तातडीने निर्णय घेतल्या नाही, तर रास्तारोको आंदोलन करू, असा इशारा धनगर आरक्षण कृती समितीने घेतला आहे. या संदर्भात मालेगाव तहसीलदार आणि शिरपूरच्या पोलीस निरीक्षकांना १० आॅगस्ट रोजी निवेदनही सादर करण्यात आले.  निवेदन देते वेळी विजय शेंडगे, नागेश गावजे, गोपाल टोंचर, गजानन जटाळे, गणेश बोबडे, उमेश बोबडे, किसन गारगे, नवनाथ जटाळे, ओमप्रकाश हुले, बबनराव मिटकरी आदि धनगर समाज बांधव उपस्थित होते.

Web Title: Dhangar society aggressive for reservation; Road stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.