शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

धनगर आरक्षण आक्रोश महामेळाव्याची पूर्वतयारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 13:05 IST

वाशिम : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्याच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाशिम येथे २० जानेवारीला धनगर आरक्षण आक्रोश महामेळावा होत असून, या महामेळाव्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात गावोगावी बैठका, कॉर्नर सभा घेतल्या जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्याच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाशिम येथे २० जानेवारीला धनगर आरक्षण आक्रोश महामेळावा होत असून, या महामेळाव्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात गावोगावी बैठका, कॉर्नर सभा घेतल्या जात आहेत. १५ जानेवारी रोजी वाशिम शहरासह ग्रामीण भागात रात्री ८ वाजताच्या सुमारास बैठक घेण्यात आली.मागील कित्येक वर्षांपासून धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असून आतापर्यंतच्या कुठल्याही सरकारने धनगर आरक्षण अंमलबजावणीकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, असा आरोप करीत या प्रलंबित मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाशिम येथे आक्रोश महामेळावा आयोजित केला आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ३४२(१) अंतर्गत महाराष्ट्र राज्याच्या अनूसूचित जमातीच्या यादीत ओरॉन, धनगर (धनगड) जमातीचा समावेश असून येथील प्रस्थापित राजकीय व्यवस्थेने महाराष्ट्रात ‘धनगड’ अस्तिवात नसताना ‘धनगर-धनगड’ वेगवेगळ्या जमाती असल्याच्या ठरवून गेली ६५ वर्षापासून धनगर जमातीला एसटी आरक्षणापासून वंचित ठेवले, असा आरोप करीत धनगर समाजबांधवांनी आरक्षणासाठी ‘एल्गार’ पुकारला आहे. मागील २०१४ निवडणूकीपुर्वी सत्तेतील भाजपा युती सरकारने  धनगर आरक्षण प्रश्न पहिल्या कॅबिनेटमध्ये मार्गी लावू, असे आश्वासित केले होते. मात्र, अद्याप या आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही. या प्रलंबित मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाशिम येथे २० जानेवारी २०१९ रोजी धनगर आरक्षण आक्रोश महामेळावा असून, जनजागृतीपर जिल्हाभरात बैठका घेतल्या जात आहेत. या महामेळाव्यात धनगर  समाजातील मान्यवर नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. १५ जानेवारीला वाशिमसह ग्रामीण भागात बैठका घेत या महामेळाव्याची पूर्वतयारीवर चर्चा करण्यात आली. या महामेळाव्यास धनगर समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन धनगर समाज संघर्ष समिती वाशिमचे जिल्हाध्यक्ष महादेव लांभाडे, वाशिमचे नगरसेवक बाळू मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती किसनराव मस्के, पंचायत समिती सदस्य विलास लांभाडे यांच्यासह धनगर समाज संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमDhangar Reservationधनगर आरक्षण