शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शहर विकासाला चालना नाही; पालिका प्रशासनाविरूद्ध वाशिमकरांचे ‘धूळ फेक’ आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 15:07 IST

वाशिम: शहरा तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून भुमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. कामाची गती अत्यंत संथ असल्याने याविरूद्ध संतप्त शहरवासीयांनी नगर परिषदेवर बुधवार, १७ जानेवारीला ‘धूळ फेक’ आंदोलन केले.

ठळक मुद्देशासनस्तरावरून शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. विकासाला हवी तशी चालना अद्याप मिळाली नसून शहरांतर्गत रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. नगर परिषदेच्या या गलथान कारभारामुळे नागरिकही कमालीचे वैतागले आहेत. 

वाशिम: शहरा तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून भुमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. या कामाची मुदत दोनवेळा संपून लक्ष्मी  सिव्हील इंजिनिअरींग सर्व्हीसेस, प्रा.लि. कोल्हापूर या कंपनीला मुदतवाढ देणयात आली. त्याऊपरही कामाची गती अत्यंत संथ असल्याने याविरूद्ध संतप्त शहरवासीयांनी नगर परिषदेवर बुधवार, १७ जानेवारीला ‘धूळ फेक’ आंदोलन केले.शासनस्तरावरून शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. मात्र, विकासाला हवी तशी चालना अद्याप मिळाली नसून शहरांतर्गत रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. पाणीपुरवठ्यासाठी योग्यरित्या जलवाहिनी न टाकता आधी रस्त्याचे काम उरकले जात आहे. त्यामुळे जलवाहिनीच्या कामादरम्यान पुन्हा रस्ता फोडावा लागणार आहे. नगर परिषदेच्या या गलथान कारभारामुळे नागरिकही कमालीचे वैतागले आहेत. भूमिगत  गटार योजनेच्याा कामातील हलगर्जीपणामुळे शहरात ठिकठिकाणी धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे विशेषत: लहान मुले व वृद्ध नागरिकांना श्वसनांच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यास सर्वस्वी नगर परिषद प्रशासनच जबाबदार आहे. दरम्यान, या सर्व गंभीर प्रकारांची तत्काळ दखल घेवून नागरिकांना दिलासा द्या; अन्यथा नागरी रोष बळावल्याशिवाय राहणार नाही, असे निवेदनात नमूद आहे. निवेदन देताना शहरातील नागरिक, युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.बैलबंडीद्वारे  प्रचार ठरला लक्ष्यवेधी!शहरातील नागरिकांनी नगर परिषदेवर धडक देताना भुमिगत गटार योजनेविषयी संताप दर्शविणारा प्रचार केला. त्याचे फलक बैलबंडीवर लावून ही बैलबंडी थेट नगर परिषदेच्या आवारात घुसविण्यात आली. त्याठिकाणी उपस्थित अधिकाºयांकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. हा प्रकार लक्ष्यवेधी ठरला.

टॅग्स :washimवाशिमWashim Nagarpalikaवाशिम नगरपालिकाagitationआंदोलन