शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

"नावली जि.प. शाळा पॅटर्न" राबविण्याचा निर्धार

By admin | Updated: July 3, 2017 20:29 IST

वाशिम : वर्षातील ३६५ दिवसही भरणारी नावली येथील जिल्हा परिषद शाळा इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असून, या शाळेचा पॅटर्न अन्य जिल्हा परिषद शाळेत राबविण्याचा निर्धार जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वर्षातील ३६५ दिवसही भरणारी नावली येथील जिल्हा परिषद शाळा इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असून, या शाळेचा पॅटर्न अन्य जिल्हा परिषद शाळेत राबविण्याचा निर्धार जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे. यासंदर्भात नावलीच्या शिक्षकांशी संवाद साधला असून, लवकरच तालुकानिहाय बैठका घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी सोमवारी दिली.खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक दर्जा दर्जेदार नसतो, अशी मानसिकता श्रीमंत गटातील बहुतांश पालकांची होत आहे. यातूनच श्रीमंत गटातील पालक आपल्या पाल्याचा प्रवेश शक्यतोवर जिल्हा परिषद शाळेत निश्चित करीत नसल्याचे दिसून येते. मात्र, हा समज रिसोड तालुक्यातील नावली येथील जिल्हा परिषद शाळेने खोडून काढला आहे. नावली येथील शिक्षकांनी गत वर्षीपासून अनोखे उपक्रम राबविले तसेच पालकांचा विश्वास संपादन केला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेला स्वत:ची शाळा समजून विद्यार्थ्यांना नियोजित वेळेव्यतिरिक्तही शिक्षणाचे धडे दिले. उन्हाळ्यातही सुट्टी न घेता सकाळच्या सत्रात गणित, विज्ञान, भाषा व अन्य विषयांचे ह्यवर्गह्ण घेतले. या सर्व सकारात्मक प्रयत्नांमुळे आजरोजी नावली जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी हाऊसफुल झाल्याने ह्यप्रवेश बंदह्णचे फलक लावण्याची वेळ आली आहे. नावलीच्या शिक्षकांनी ही किमया कशी साधली? याची सविस्तर माहिती घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी शनिवार, १ जुलै रोजी सायंकाळी जिल्हा परिषदेत संवाद कार्यक्रम घेतला. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती सुधीर पाटील गोळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, रिसोडचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी खराटे, सर्व शिक्षा अभियानाचे अभियंता माहोरे, गवई आदींची उपस्थिती होती. यावेळी नावली शाळेचे मुख्याध्यापक गारडे म्हणाले की, आपली शाळा समजून विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठेवल्याने पालकांचा विश्वास बसला. यापूर्वी नावली गावातून रिसोड, मालेगाव येथे तीन स्कूल बसमधून विद्यार्थी शिक्षणासाठी खासगी शाळेत जात होते. नावली जिल्हा परिषद शाळेतही अनोखे उपक्रम राबविल्याने आणि शाळेत आवश्यक त्या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध झाल्याने यावर्षी नावली येथे अन्य ठिकाणाची एकही स्कूल बस विद्यार्थी घेण्यासाठी येत नाही. नावलीचा हा उपक्रम जिल्ह्यातील अन्य जिल्हा परिषद शाळांनी राबविल्यास जिल्हा परिषद शाळांवर पालकांचा विश्वास बसेल, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. यासंदर्भात मुख्याध्यापकांशी चर्चा करण्यासाठी लवकरच तालुकास्तरावर बैठक आयोजित करण्याच्या सूचना पाटील यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना केल्या.