शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चांगल्या पावसानंतरही अमरावती विभागात हरभऱ्याच्या क्षेत्रात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 13:57 IST

वाशिम: अमरावती विभागात यंदा समाधानकारक पाऊस पडला असला तरी, गतवर्षीच्या तुलनेत यंदा हरभरा पिकाचे क्षेत्र घटले आहे.

वाशिम: अमरावती विभागात यंदा समाधानकारक पाऊस पडला असला तरी, गतवर्षीच्या तुलनेत यंदा हरभरा पिकाचे क्षेत्र घटले आहे. तथापि, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात मात्र या पिकाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. अद्याप रब्बीची पेरणी सुरू असली तरी, हरभºयाच्या पेरण्या आटोपल्या असल्याने या पिकाच्या क्षेत्रात फारसी वाढ होण्याची शक्यता उरली नाही.गत तीन वर्षांच्या तुलनेत यंदा बुलडाणा जिल्हा वगळता अमरावती विभागात समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे जलप्रकल्प तुडूंब भरले आणि शेतकºयांना सिंचनाची सोय झाली. साहजिकच यामुळे रब्बीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली होती. प्रत्यक्षात पाऊस चांगला पडूनही रब्बीचे क्षेत्र घटल्याचे विभागस्तरावरील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. रब्बी पिक पेरणीच्या ३ जानेवारी रोजीच्या अहवालानुसार अमरावती विभागात ५१८३४२ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. त्यात हरभरा पिकाचे क्षेत्र सर्वाधिक असले तरी वाशिम आणि यवतमाळ वगळता गतवर्षीच्या तुलनेत इतर जिल्ह्यात या पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. गतवर्षी बुलडाणा जिल्ह्यात १३२२४६ हेक्टर क्षेत्रावर हरभºयाची पेरणी झाली होती, तर यंदा ३ जानेवारीपर्यंत केवळ ९५९१६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली, अकोला जिल्ह्यात गतवर्षी ७५३३६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, तर यंदा केवळ ५३३६२ हेक्टरवर पेरणी झाली. अमरावती जिल्ह्यात गतवर्षी १०३९१२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, तर यंदा केवळ ८७३४३ हेक्टर क्षेत्रावर हरभºयाची पेरणी झाली आहे. वाशिम जिल्ह्यात गतवर्षी केवळ ४९५८४ हेक्टर क्षेत्रावर हरभरा पेरणी झाली होती, तर यंदा त्यात जवळपास २० हजार हेक्टरने वाढ होऊन हरभºयाचे क्षेत्र ७०२०८ हेक्टर झाले आहे. त्याशिवाय यवतमाळ जिल्ह्यात गतवर्षी ९४१४० हेक्टर क्षेत्रावर हरभरा पेरणी झाली होती, तर यंदा ९९१८० हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. गतवर्षी अमरावती विभागात एकूण ४५५२१८ हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी झाली होती, तर यंदा ३ जानेवारीपर्यंत केवळ ४०६००९ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. आता हरभºयाची पेरणी आटोपत असताना या पिकाच्या क्षेत्रात फारसी वाढ होण्याची शक्यता उरली नाही.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती