शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

वाशिम जिल्ह्यातील नविन आरोग्य संस्थांसाठी पदनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 14:56 IST

वाशिम जिल्ह्यातील मुसळवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासह सहा आरोग्य उपकेंद्रांसाठी मिळून ३३ पदांच्या निर्मितीस ६ जूनच्या निर्णयाद्वारे मंजुरी दिली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्यातील बांधकाम पुर्ण झालेल्या, एकूण ७१ नवीन आरोग्य संस्थांसाठी नियमीत पदे, काल्पनिक कुशल पदे  आणि काल्पनिक अकुशल पदे निर्माण करण्यासह संबंधित आरोग्य संस्थांचे कामकाज सुरु करण्यास शासनाने ६ जूनच्या निर्णयाद्वारे मान्यता दिली असून, यात वाशिम जिल्ह्यातील मुसळवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासह सहा आरोग्य उपकेंद्रांसाठी मिळून ३३ पदांच्या निर्मितीस ६ जूनच्या निर्णयाद्वारे मंजुरी दिली आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने २७ जून २०१२, १७ जानेवारी २०१३ आणि ९ जून २०१४ च्या शासननिर्णयानुसार आरोग्य विभागांतर्गत ग्रामीण क्षेत्रात नविन आरोग्य संस्था स्थापन करण्यास मान्यता दिली होती. सदर आरोग्य संस्थांचे बांधकाम पूर्ण झाले असून, या आरोग्य संस्थांसाठी १६ जानेवारी २००३ आणि ३० डिसेंबर २००६ च्या निर्णयांस अनुसरून नविन आरोग्य संस्थांसाठी आवश्यक असणाºया पदांचा आकृतीबंधही तयार करण्या आणि काल्पनिक अकुशल पदे निर्माण करण्यासह संबंधित आरोग्य संस्थांचे कामकाज सुरु करण्यास शासनाने ६ जूनच्या निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे. यात जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील  शेलू (बु.) आणि वारा जहॉगिर,, मालेगाव तालुक्यातील भौरद आणि कोळगाव, रिसोड तालुक्यातील येवता आणि मानोरा तालुक्यातील रुई येथील आरोग्य उपकें द्रांचा समावेश असून, या उपकेंद्रात नियमीत पदांपैकी ए.एन.एम., गट-क, आरोग्य सेवक, गट-क , तसेच काल्पनिक कुशल पदांपैकी अंशकालीन स्त्री परिचर अशी प्रत्येकी एक मिळून तीन पदांची स्थापना करण्यात आली आहे.  मुसळवाडी आरोग्य केंद्रासाठी १५ पदेबिगर आदिवासी उपयोजनेंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या मालेगाव तालुक्यातील मुसळवाडी येथील प्राथमिक आरोग्य कें द्रासाठी नियमीत पदांपैकी २ वैद्यकीय अधिकारी गड-ड, १ पुरुष आरोग्य सहाय्यक गट-क , १ स्त्री आरोग्य सहाय्यक गट-क, १ ए.एन.एम गट, अशी एकूण पाच, तर काल्पनिक कुशल पदांपैकी १ पुरुष आरोग्य सहाय्यक, १ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, १ औषधनिर्माण अधिकारी, १ कनिष्ठ लिपिक गट-क, १ वाहन चालक, १ स्त्री परिचर गट-ड आणि ३ पुरुष परिचर गट-ड मिळून एकूण ९, तर काल्पनिक अकुशल पदांपैकी १ सफाई कामगार गट-ड, अशी तीन संवर्गातील मिळून एकूण १५ पदे निर्मितीस मंजूरी देण्यात आली आहे. आता पदांची स्थापना झाल्याने येत्या काही दिवसांत हे प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित होऊन ग्रामीण जनतेला आरोग्यसुविधा प्राप्त होणार आहेत.

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य