महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनच्या जिल्हा शाखेअंतर्गत ग्रामीण अंगणवाडी कर्मचारी ‘आयटक’शी जुळलेल्या अंगणवाडी सेविकांनी कॉ. डिगांबर अंबोरे, सुनीता पाटील, नयन गायकवाड, सविता इंगळे यांच्या नेतृत्वात मोबाईल वापसी आंदोलन केले. यावेळी वाशिम तालुक्यातील शेकडो अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. सर्वांनी वैयक्तिक अर्जांसह मोबाईल परत केले. आंदोलनाच्या यशस्वितेसाठी तालुका पदाधिकारी सरस्वती सुर्वे, संगीता खिल्लारे, सरस्वती देशमुख, छाया खंडारे, अंजू वानखडे, शारदा माल, आदींनी पुढाकार घेतला.
..............
बाॅक्स :
मोबाईल हँग होण्याचे प्रकार वाढले
दोन वर्षांपूर्वी मिळालेले मोबाईल आता जुने झाले आहेत. दोन जीबी रॅम असलेल्या मोबाईलच्या माध्यमातून द्याव्या लागणाऱ्या अहवालांची माहिती तुलनेने अधिक आहे. यामुळे मोबाईल वारंवार हँग होण्याचे प्रकार वाढले आहेत दुरुस्तीसाठी तीन हजारांपेक्षा अधिक खर्च असल्याने नाइलाजास्तव मोबाईल परत करावे लागत असल्याची माहिती सरस्वती सुर्वे यांनी दिली.