शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मृतक शेतकर्‍याच्या घरासमोरच लोकप्रतिनिधींचे धरणे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 01:28 IST

वाशिम: येथून जवळच असलेल्या वाघळुद येथील शेतकरी किसन मस्के यांनी सततची नापिकी व कर्जाला कंटाळून ४ फेब्रुवारीला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ घेऊन ११ जिल्हय़ांमध्ये भ्रमंती करणारे काटोलचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनी ५ फेब्रुवारीला मृतक शेतकर्‍याच्या कुटुंबीयाची भेट घेऊन शासनाच्या निषेधार्थ तेथेच धरणे आंदोलन केले.

ठळक मुद्देआमदार डॉ. देशमुख यांची शासनावर टीका विदर्भातील विविध प्रलंबित प्रश्नांवर झाले मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: येथून जवळच असलेल्या वाघळुद येथील शेतकरी किसन मस्के यांनी सततची नापिकी व कर्जाला कंटाळून ४ फेब्रुवारीला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ घेऊन ११ जिल्हय़ांमध्ये भ्रमंती करणारे काटोलचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनी ५ फेब्रुवारीला मृतक शेतकर्‍याच्या कुटुंबीयाची भेट घेऊन शासनाच्या निषेधार्थ तेथेच धरणे आंदोलन केले.विदर्भाची सद्य:स्थिती, सिंचनाचा अनुशेष, शेतकर्‍यांचे विविध प्रश्न, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, उद्योगधंदे, भारनियमन, कुपोषण, नक्षलवाद यासह इतर प्रश्नांवर विदर्भातील जनतेची मते जाणून घेण्यासाठी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ काढली असून, ७ जानेवारीपासून निघालेली ही यात्रा १३ फेब्रुवारीपर्यंत विदर्भातील ६२ मतदारसंघांमधून भ्रमंती करणार आहे. दरम्यान, ५ फेब्रुवारीला आमदार डॉ. देशमुख यांनी वाघळुद येथील शेतकरी किसन मस्के यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. केवळ १0 हजारांच्या कर्जासाठी किसन मस्के यांना आत्महत्या करावी लागली, ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगून त्यांनी शासनच्या धोरणावर कडाडून टीका केली. याप्रसंगी आमदार अमित झनक यांच्यासह अँड. किरण सरनाईक, जुगल कोठारी, दत्तराव धांडे, सरपंच कृष्णा देशमुख, तहसीलदार राजेश वजिरे उपस्थित होते. तत्पूर्वी, विदर्भ आत्मबळ यात्रेसोबत आलेल्या डॉ. देशमुख आणि इतर कार्यकर्त्यांनी वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काही वेळ धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. देशमुख म्हणाले, की कापूस, सोयाबीन यासारख्या खरीप पिकांना दीडपटीने मिळणारा हमीभाव काय राहील, हे राज्य सरकारने जाहीर करावे, निव्वळ घोषणाबाजी करून शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, बेरोजगारांना रोजगार मिळणार नाही. त्यामुळे शासनाने ठोस धोरण जाहीर करणे अपेक्षित आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. सोयाबीनवरील लाल्या आणि कापसावरील बोंडअळीचा प्रादुर्भाव शेतकर्‍यांना त्रस्त करून सोडत आहे. अपूर्ण सिंचन प्रकल्पांसाठी अत्यल्प निधी मिळतो, म्हणूनच सिंचनाचा अनुशेष वाढत आहे. शेतीला पुरेशी वीज मिळणे दुरापास्त झाले आहे. हे सर्व प्रश्न कसे सुटतील, याचे उत्तर शासनाने द्यायला हवे, असे ते म्हणाले. 

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलनFarmerशेतकरी