शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

असंघटीत महिला कामगारांच्या मागण्या प्रलंबित; काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 17:56 IST

वाशिम : जिल्हा घरेलु असंघटीत महिला कामगारांच्या मागण्या प्रलंबित असून, याविरोधात काँग्रेसने आवाज उठविला आहे. प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी घरेलू महिलांसह काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवेदन दिले.  

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा घरेलु असंघटीत महिला कामगारांच्या मागण्या प्रलंबित असून, याविरोधात काँग्रेसने आवाज उठविला आहे. प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी घरेलू महिलांसह काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवेदन दिले.  महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली असंघटीत क्षेत्रातील कामे करणाºया  महिला कामगारांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. घरेलु महिला कामगारांना आयएलओच्या निकषाप्रमाणे फायदे देण्यात यावे, घरेलु महिला कामगार कल्याणकारी मंडळाव्दारे पुर्ववत योजनेचे फायदे मिळावे, कल्याणकारी योजनांचा समावेश करावा, घरेलु कामगार महिलांना पेन्शन लागु करावी,  त्यांना स्वस्त पुरवठा धान्य योजनेतुन लाभार्थी म्हणुन स्वस्तधान्य केरोसीन मिळण्यात यावे, बचत गटाच्या माध्यमातुन व्यवसाय करणाºया  महिलांसाठी कर्जपुरवठा व इतर  सोयी उपलब्ध कराव्या, अल्पसंख्यांक महिला बचत गटाचे मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाकडे असलेली प्रलंबीत कर्जप्रकरणे त्वरित निकाली काढावी, सदर कामगार महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षा प्रदान करावी, त्यांच्यावरील अन्याय व अत्याचाराला प्रतिबंध लावण्यात यावे व असंघटीत महिला कामगारांना रात्रपाळीवरचे काम देण्यात येवु नये आदी मागण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.दिलीपराव सरनाईक व जिल्हा असंघटीत कामगार काँग्रेसचे अध्यक्ष राजुभाऊ चौधरी यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. यावेळी काँग्रेस कमेटीचे माजी तालुकाध्यक्ष परशराम भोयर, सेवादलचे जिल्हाध्यक्ष विशाल सोमटकर, चांदबी शेख हाशम, फिरोजाबी शेख महेबुब, समीनाबी शेख इस्माईल,  दिपमाला ज्ञानेश्वर पाईकराव,  जुलेखा बी शेख महेमुद, आरिफाबी महेमुद याकुब, परजानाबी अब्दुल कलीम,  सिमा परवीन शेख सलीम,  आशा राजु रोकडे, संगीता संतोष भडके, सुरेश धोडुपंत रत्नपारखी आदिंची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमcongressकाँग्रेस