शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

शेलुबाजारच्या मुख्य चौकाच्या दुरूस्तीच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: June 17, 2014 23:48 IST

चौकातील या मार्गाचे काम त्वरित सुरू न केल्यास सतिआई जेष्ठ नागरिक संघाचे सर्व सभासद रस्त्यावर उतरतील असा इशारा संघाचे अध्यक्ष ज्योतीराम आंबेकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिला आहे

मंगरूळपीर : शेलूबाजार येथील मुख्य चौकातील अकोला मार्गाची अत्यंत दैयनीय अवस्था झाली असून जेष्ठ नागरिकांना चौकातील या रस्त्यावर मार्गक्रमण करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे चौकातील या मार्गाचे काम त्वरित सुरू न केल्यास सतिआई जेष्ठ नागरिक संघाचे सर्व सभासद रस्त्यावर उतरतील असा इशारा संघाचे अध्यक्ष ज्योतीराम आंबेकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिला आहे प्रसिध्दी पत्रकात पुढे म्हटले आहे की शेलूबाजार चौकातील दुरवस्था मागील कित्येक वर्षांपासून जशीच्या तशीच आहे त्यात सुधारणा करण्यासंदर्भात कुठलीच कारवाई सार्वजनिक बांधकाम विभागाने केली नाही त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून जेष्ठ नागरिकांना पावसाळय़ाच्या दिवसात चिखलमय खड्ड्याचा सामना करावे लागत आहे यावर्षी तरी चौकातील रस्त्याची पावसाळ्यापुर्वी दुरूस्ती होऊन दरवर्षी होणारा त्रास थांबेल अशी नागरिकांना आशा होती. परंतु पावसाळा सुरू होण्याच्या बेतात असूनही यासंदर्भात कसलीही हालचाल होताना दिसत नाही.ज्येष्ठांकडे लहान चिमुकल्यांना कॉन्व्हेटमध्ये ने -आणण्याची जबाबदारी असत.ही जबाबदारी पार पाडताना चौकातील अकोला रस्ता जीवघेणा ठरू लागला आहे. अनेकवेळा सुसाट वेगाने येणार्‍या वाहनामुळे डबक्यातील चिखल अंगावर उडाल्यावर जेष्ठांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.अशा चिखलमय रस्त्यावरून पाय घसरून पडल्याचे अनेक किस्से घडलेत.मात्र संबधित विभाग मागील काही वर्षांपासून या चौकाकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.चौकातील अकोला मार्गावर महाविद्यालय ,कॉन्व्हेंट,प्राथमिक आरोग्य केंद्र,पशुवैद्यकीय दवाखाना,बाजार समिती अशी अनेक महत्वाची ठिकाणो आहेत त्याच बरोबर प्रवाशांसाठी बस थांबा याच मार्गावर असल्याने मोठी वर्दळ असत.त्यामुळे गर्दीतून मार्गक्रमण करताना ज्येष्ठांना अक्षरश: कसरत करावी लागत असल्याचे चित्र गेल्या तीन वर्षांपासून दिसून येत आहे.परंतु प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे चौकातील अकोला मार्गाची दुरावस्था सुधारण्याचे लक्षण दिसत नाही.येत्या पावसाळय़ापुर्वी काम पुर्ण न केल्यास सतिआई जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंबेकर यांनी दिला आहे.