शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

वाशिम जिल्ह्याच्या भुजल पातळीत सव्वा मीटरची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 3:35 PM

जिल्ह्यातील ७९ सर्वेक्षण विहिरींच्या पातळीची पडताळणी केल्यानंतर भुजल पातळीत मागील पाच वर्षांच्या तुलनेत सरासरी १.१२ मीटरची घट आल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात उन्हाच्या झळा वाढत असतानाच विहिरीही कोरड्या पडू लागल्या आहेत. एकिकडे नळाने येणाºया पाण्यामुळे शहरात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत नसले तरी, विहिरीचा तळ खरवडून काढण्याची वेळ आल्याचे मार्चच्या अखेरपासूनच दिसत असून, जिल्ह्यातील ७९ सर्वेक्षण विहिरींच्या पातळीची पडताळणी केल्यानंतर भुजल पातळीत मागील पाच वर्षांच्या तुलनेत सरासरी १.१२ मीटरची घट आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मे महिन्यात तीव्र पाणीटंचाईची शक्यता आहे. जिल्ह्यात सरासरी ७९८.७० मिलीमिटर पाऊस पडतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून यात अनियमितता दिसून येते. त्यामुळे जिल्ह्याची पर्जन्यमानाची सरासरी कमी-अधिक होऊ लागली. मात्र सर्व धरणांमध्ये पाणीसाठा पुरेसा होत असल्याने फारशी पाणी टंचाई जाणवत नाही. वाशिम जिल्ह्याचे भूगर्भीय क्षेत्र मुख्यत: दख्खन बस्तर लाव्हा या प्रकारच्या खडकाचे आहे; पूर्णपणे बेसॉल्टने आच्छादित असलेल्या या जिल्ह्यात काही ठिकाणी विघटित, तर काही ठिकाणी व्हेसिक्युकर झिओलिटिक प्रस्तराची झीज झाली आहे. यामुळे पडलेल्या भेगांमुळे सच्छिद्रता निर्माण होऊन भूजल साठा होण्यास मदत होते; परंतु पावसाची प्रत्यक्ष सरासरी ही कागदावर मोठी दिसत असली तरी, गेल्या ५ वर्षांत जमिनीत मुरणारा पाऊस फारसा जिल्ह्यात पडलेला नाही. पडणार्‍या पावसाचा कालावधी कमी झाल्याने, तसेच पडलेल्या पावसाचे पाणी वेगाने वाहून जाते. याचा परिणाम भूजल पातळीवर होऊ लागला आहे. जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागाच्यावतीने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील मिळून प्रायोगिक तत्वावर ७९ विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले. यात २०१४ ते २०१९ ची सरासरी पाणी पातळी आणि जानेवारी २०१९ मध्ये केलेल्या भूजल सर्वेक्षण विभागाने सर्वेक्षणात भूजल पातळी सरासरी १.१२ मीटरने घटल्याचे आढळून आले आहे. त्यामध्ये कारंजा ०.७४, रिसोड १.५०, मंगरुळपीर ०.६६, वाशिम १.३२, मालेगाव १.१७ आणि मानोरा १.३३ असे भूजल पातळीचे तालुकानिहाय घटलेले प्रमाण आहे. भूजलपातळी वाढवण्यासाठी 'पाणी आडवा, पाणी जिरवा' अभियानाबरोबरच पाणी उपशावर निर्बंध घालण्याची आवश्यकता आहे. भूजल पातळी घटल्याचा सर्वाधिक फटका कूपनलिकांच्या खोदकामाला बसला आहे. यापूर्वी जिल्ह्याच्या कोणत्याही भागात सरासरी १५० ते २०० फुटांपर्यत कपनलिका खोदल्या जात होत्या; परंतु गेल्या तीोन वर्षांपासून कूपनलिकांचे खोदकाम ३०० फुटांच्यावर पोहोचले आहे.  रिसोड तालुक्यातील स्थिती सर्वात गंभीर!रिसोड तालुक्यात शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानासह सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत गतवर्षीच्या आॅगस्टपासून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत. तथापि, या तालुक्यात गतवर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत खूप कमी पाऊस पडला. त्यातच सिंचनासाठी झालेल्या वारेमाप उपशामुळे या तालुक्यातील भूजल पातळी ही जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणात घटली असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्ष मार्च महिन्याच्या अखेरीस करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार या तालुक्यातील भूजल पातळी मागील पाच वर्षांत सरासरी १.५० मीटरने घटली आहे. त्यामुळे या तालुक्यात आता पाणीटंचाईची स्थिती गंभीर झाली आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी