शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

ग्रामपंचायतींनी विद्यूत सेवा पुरविण्याचा निर्णय अधांतरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 17:48 IST

वाशिम : विद्यूत पुरवठ्यात ऐनवेळी बिघाड झाल्यास किंवा दुरूस्ती करायची झाल्यास कार्यरत लाईनमनच्या सेवा तातडीने उपलब्ध होऊ शकत नाहीत.

ठळक मुद्देकाही सेवा ग्रामपंचायतींनी ‘फ्रान्चायझी’ म्हणून देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने २० आॅक्टोबर २०१६ ला घेतला. दीड वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटूनही त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विद्यूत पुरवठ्यात ऐनवेळी बिघाड झाल्यास किंवा दुरूस्ती करायची झाल्यास कार्यरत लाईनमनच्या सेवा तातडीने उपलब्ध होऊ शकत नाहीत. ही बाब लक्षात घेवून महावितरणकडून पुरविण्यात येणाºया काही सेवा ग्रामपंचायतींनी ‘फ्रान्चायझी’ म्हणून देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने २० आॅक्टोबर २०१६ ला घेतला. मात्र, दीड वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटूनही त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. शासनाच्या उदासिनतेमुळे ग्रामविद्यूत व्यवस्थापक नेमणूकीचे प्रस्तावही धूळ खात पडून आहेत.तीन हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींनी ‘फ्रान्चायझी’ स्विकारल्यानंतर गावातील निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषि अशा सर्वच ग्राहकांकडील मीटरचे रिडींग घेणे, वीज देयकांचे वाटप करणे, ब्रेकडाऊन अटेंड करून सप्लाय पुर्ववत करणे, डी.ओ. फ्यूज टाकणे, रस्त्यांवरील दिवाबत्ती देखभाल व बंद पडलेले दिवे बदलणे, नवीन जोडणींची कामे करणे, थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित करणे, आदी कामांची जबाबदारी घ्यावी. या कामांसाठी ग्रामपंचायतींमार्फत उपयुक्त व क्षमता धारण करणाºया व्यक्तीची ‘ग्रामविद्यूत व्यवस्थापक’ म्हणून निवड करावी. त्यांना विद्यूत वाहिनीवर काम करण्यासाठी आवश्यक ते संपूर्ण प्रशिक्षण महावितरणमार्फत दिले जावे, त्यास प्रतिग्राहक ९ रुपयांप्रमाणे किंवा मासिक ठराविक मानधन देण्यात येईल. सदर ग्राम विद्यूत व्यवस्थापकांच्या रक्षणासाठी त्यांचा विमा काढला जाईल. आदी निर्णय ग्रामविकास खात्याने घेतले होते. प्रत्यक्षात मात्र आजपर्यंत एकाही ग्रामपंचायतीला ‘फ्रान्चायझी’ देण्यात आालेली नाही अथवा एकही ग्रामविद्यूत  व्यवस्थापकाची नेमणूक झालेली नाही. त्यामुळे शासनाच्या गचाळ धोरणाप्रती सर्वच स्तरातून नाराजीचा सूर उमटत आहे. वाशिम जिल्ह्यातील ३०० प्रस्ताव धूळ खात!जिल्ह्यातील तीन हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींनी आयटीआय (इलेक्ट्रीकल-विद्यूततंत्री) या विषयात शिक्षण घेतलेल्या बेरोजगारांचे सुमारे ३०० प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केले. तेथून हे प्रस्ताव महावितरणकडे पाठविण्यात आले. मात्र, संबंधितांना प्रशिक्षण देण्याची कार्यपद्धती कशी असेल, याचाच निर्णय अद्याप झाला नसल्याने सर्वच प्रस्ताव अद्याप धूळ खात पडून आहेत. 

जिल्ह्यातील पात्र ग्रामपंचायतींकडून पाठविण्यात आलेले ३०० पेक्षा अधिक प्रस्ताव महावितरणकडे पाठविले आहेत. संबंधित उमेदवारांना प्रशिक्षण देण्याची सोय महावितरणने करायला हवी.- नितीन माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)जिल्हा परिषद, वाशिमग्रामविद्यूत व्यवस्थापक नेमणूकीचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून प्राप्त झाले आहेत. मात्र, यासंबंधी शासनस्तरावरून अद्याप कुठल्याच सूचना नसल्याने संबंधित उमेदवारांना प्रशिक्षण देण्याचा प्रश्न प्रलंबित आहे.- आर.जी. तायडे, कार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण