शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्ती योजना; शेतकऱ्यांच्या कर्ज रकमेचे ‘ऑडिट’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 14:57 IST

शेतकऱ्यांच्या खात्याला आधार जोडणीचे काम वेगात सुरू असून, पात्र शेतकºयांच्या कर्ज रकमेचा हिशोबही करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यशासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्याला आधार जोडणीचे काम वेगात सुरू असून, पात्र शेतकºयांच्या कर्ज रकमेचा हिशोबही करण्यात येत आहे. या संदर्भात गुरुवारी दुपारी राज्याच्या मुख्यसचिवांनी व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन जिल्हाधिकाºयांसह सर्व संंबंधित अधिकारी आणि बँकांच्या अधिकाºयांना मार्गदर्शन करीत आवश्यक सुचना दिल्या असून, शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी तातडीने कर्जरकमेचा हिशोब करण्याच्या सुचना केल्या आहेत.महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - २०१९ चा लाभ देण्यासाठी प्रशासकीय कार्यवाही सुरू झाली आहे. यात राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी शेतकºयांना त्यांचे खाते आधारक्रमांकाशी कुठल्याही स्थितीत जोडणे अनिवार्य करण्यात आले असल्यामुळे या योजनेचा लाभ शेतकºयांना देण्यासाठी जिल्ह्यात आधार संलग्न बँक खाते नसलेल्या शेतकºयांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जोडण्यात येत असून,आधार लिंक खाते नसलेल्या ६१ हजारांपैकी जवळपास ४९ हजार हजार शेतकºयांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जोडण्यात (लिंक) करण्यात आले आहेत. आता उर्वरित शेतकºयांचे आधार क्रमांक खात्याशी जोडण्यात येत असतानाच प्रशासनाला शेतकºयांकडे थकित कर्जरकमेचा हिशोब जुळविण्याची लगबग प्रशासनाने सुरू केली आहे. जिल्ह्यातील ज्या शेतकºयांनी १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतले आहे आणि हे कर्ज ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत असताना त्या कर्जाची अद्यापपर्यंत संबंधित शेतकºयांनी परतफेड केली नाही, अशा थकबाकीदार शेतकºयांना महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना- २०१९ चा लाभ मिळणार आहे. आधार न जोडणाºया शेतकºयांची यादी होणार प्रसिद्धमहात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा सर्व पात्र शेतकºयांना लाभ देण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत बँकांनी मिशन मोडवर काम करुन ७ जानेवारीपर्यत थकीत कर्जदार शेतकºयांचे बँक खाते हे आधारकार्ड क्रमांकाशी संलग्नीत करावे लागणार आहेत. तथापि, निर्धारित मुदतीतही जे शेतकरी आपले खाते आधारलिंक करणार नाहीत, अशा शेतकºयांच्या याद्या प्रशासनाकडून सेवा सोसायट्या, सहनिबंधक कार्यालय, तसेच सर्व संबंधित बँकांद्वारे प्रसिद्ध करण्यात येतील. त्यानंतर या शेतकºयांना तातडीने आधार लिंक करण्याचे आवाहन करण्यात येईल.

 

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी