शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात जखमी युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 11:52 IST

Death of a youth उपचारासाठी अकोला येथे नेण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: शेलुबाजार-मंगरुळपीर मार्गावर चिखली फाट्यानजीक १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास अपघात घडून कंझरा येथील चेतन प्रभाकर वावगे (वय ३०) हा युवक गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी अकोला येथे नेण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार चेतन प्रभाकर वावगे हा रविवारी शेलूबाजार येथील दूध डेअरीवर दूध देऊन कंझरा येथे त्याच्या एम.एच. ३७ ई.९४५५  क्रमांकाच्या दुचाकीने परत जात होता. त्यावेळी चिखली फाट्यानजीक काँक्रीट मिक्सरचे वाहन व  मशीन रस्त्याच्या कडेला उभी होती. या वाहनाचा अंदाज न आल्यामुळे चेतनचा त्यावर धडकून अपघात घडला. यात चेतन प्रभाकर वावगेच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली. त्यात अति रक्तस्राव झाल्याने त्याच्यावर तत्काळ शेलुबाजार येथील प्राथमिक आरोग्य वर्धिनी केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत महाकाळ यांनी प्राथमिक उपचार केले. दुखापत गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले; परंतु अकोला येथे पोहोचण्यापूर्वी वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. चेतन हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अचानक निघून जाण्याने परिसरामध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात