शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नागपुर-औरंगाबाद दृतगती मार्गावर मार्गावरील अपघातात युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 13:00 IST

शेलूबाजार ( वाशीम ) : नागपुर औरंगाबाद दृतगती मार्गावरील जि .प. शाळेजवळ कंझरा येथील १७ वर्षीय सागर लक्ष्मण ठणठणकार या युवकाला एम .एच .३४ एबी ७८८३ या क्रमांकाच्या ट्रेलरने  चिरडल्याची घटना ११ जानेवारी रोजी सकाळी ८.४५ वाजताचे दरम्यान घडली .

लोकमत न्यूज नेटवर्कशेलूबाजार ( वाशीम ) : येथून गेलेल्या नागपुर औरंगाबाद दृतगती मार्गावरील जि .प. शाळेजवळ कंझरा येथील १७ वर्षीय सागर लक्ष्मण ठणठणकार या युवकाला एम .एच .३४ एबी ७८८३ या क्रमांकाच्या ट्रेलरने  चिरडल्याची घटना ११ जानेवारी रोजी सकाळी ८.४५ वाजताचे दरम्यान घडली . या घटनेनंतर नागपुर - औरंगाबाद दृतगती मार्गावर चौकात नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन सुरु केले . १० वाजेपासून सुरु असलेल्या आंदोलनामुळे नागपुर औरंगाबाद व मंगरुळपीर अकोला मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. दिड महिन्यापुर्वी २५ नोव्हेंबर रोजी याच ठिकाणी एका युवकाचा ट्र्क अपघातात मृत्यू झाला होता , ती घटना ताजी असतानाच पुन्हा त्याच घटनास्थळावर निष्पाप युवकाचा बळी गेला असल्याने शेलूबाजार येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहे . वारंवार घडणाऱ्या घटना टाळण्यासाठी प्रशासन केवळ आश्वासन देत असल्याने ग्रामस्थांनी स्थानीक चौकात रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे.त्या घटनेच्यावेळी करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनच्यावेळी गावातून जाणार्‍या मार्गावर ठिक ठिकाणी गतिरोधक निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते ,परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही किंवा वळण मार्गाचा प्रश्न निकाली निघाला नाही. १० वाजेपासून अपघातात मृत्यू झालेल्या सागरचे आई, वडील, नातेवाईक नागरिक चौकात ठाण मांडून बसले होते. आंदोलन सुरु असतांनाच घटनास्थळावरुन मृतदेह घेवून पोलीसाची गाडी चौकातून जात असतांना आंदोलकांचा रोद्ररुप पहावयास मिळाला . हेच नव्हे तर ज्या ट्रेलरने अपघात झाला तो ट्रेलर घटनास्थळावरुन हटवून चौकात आणल्या गेले तेव्हा  परिस्थीती बिघडली होती. नागरिकांनी त्या ट्रेलरच्या टायरची हवा काढून टाकली. सोबत दृतगती मार्गावरुन जाणार्‍या पोलीस व्हॅनला आंदोलकाचा सामना करावा लागला. मंगरुळपीरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी नंदा पाराजे, तहसिलदार वैशाख वाहुरवाघ, ठाणेदार जायभाये यांनी आंदोलकांना समजविण्याचा प्रयत्न केला ,परंतु आंदोलक समजून घेण्याच्या परिस्थितीत नव्हते. अडीच तासापासून आंदोलन सुरु असल्याने शाळकरी मुलाचे व रुग्नांचे वाहने वगळता सर्वच वाहने अडकूनल पडली आहे.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात