शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 17:34 IST

संतोष सखाराम मुळे (३९) रा. माधव नगर, वाशिम याचा उपचारादरम्यान अकोला येथे १३ डिसेंबर रोजी मृत्यू झाला.

ठळक मुद्दे संतोष हा रिसोड मार्गावरील एका शेतात नारायण नागरे व संतोष नागरे यांच्यासोबत दररोज काम करीत होता.संतोष नागरे व पिंटू सोपान चौधरी यांनी त्याला जखमी अवस्थेत घरी आणून परत गेले.

वाशिम : प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संतोष सखाराम मुळे (३९) रा. माधव नगर, वाशिम याचा उपचारादरम्यान अकोला येथे १३ डिसेंबर रोजी मृत्यू झाला.संतोष मुळे याची आई राधाबाई सखाराम मुळे (६५) यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना दोन मुले असून, संतोष हा   मोठा आहे. संतोष हा रिसोड मार्गावरील एका शेतात नारायण नागरे व संतोष नागरे यांच्यासोबत दररोज काम करीत होता. ६ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता संतोष हा नेहमीप्रमाणे कामावर गेला असता, सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास संतोष नागरे व पिंटू सोपान चौधरी यांनी त्याला जखमी अवस्थेत घरी आणून परत गेले. संतोष नागरे, नारायण नागरे, पिंटू चौधरी व बालू यांनी संगणमत करून जबर मारहाण केल्याचे संतोष मुळे याने सांगितले. जखमीला उपचारार्थ वाशिम येथील खासगी दवाखान्यात दाखल केले असता, प्रकृती गंभीर असल्याने अकोला नेण्यात आले. उपचारादरम्यान १३ डिसेंबर रोजी संतोष मुळे याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाशिम शहर पोलिसांनी आरोपी संतोष नागरे, पिंटू सोपान चौधरी, बाळू व नारायण नागरे यांच्याविरुद्ध भादंवी कलम ३०७, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी