शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

किटकनाशक प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 15:56 IST

येथील शेतकरी उल्हास चंदू जाधव (४५) यांनी १७ जुलै रोजी किटकनाशक औषध प्राशन केले. यवतमाळच्या रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा २० जूलै रोजी मृत्यू झाला. 

लोकमत न्यूज नेटवर्कतळप बु. (वाशिम) : गेल्या चार वर्षांपासून सातत्याने ओढवत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि याहीवर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने अंगाशिरावर वाढत चाललेले बँकेचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत येथील शेतकरी उल्हास चंदू जाधव (४५) यांनी १७ जुलै रोजी किटकनाशक औषध प्राशन केले. यवतमाळच्या रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा २० जूलै रोजी मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, तळप बु. येथील शेतकरी उल्हास जाधव यांच्या नावे दोन एकर  शेती असून त्यावरच स्वत:सह पत्नी आणि दोन मुलींचा ते उदरनिर्वाह करित असत. तीन ते चार वर्षांपासून मात्र सततच्या दुष्काळामुळे कुटूंबाचा गाडा ओढणे अशक्य झाले. यावर्षी त्यांनी भारतीय स्टेट बँकेच्या मानोरा शाखेकडून खरीप हंगामाकरिता ३७ हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्याआधारे दोन एकर शेतात पेरणी केली; मात्र पावसाने दडी मारल्याने डोळ्यादेखील पीक सुकत असल्याने पाहून ते चिंताग्रस्त झाले आणि याच विवंचनेत त्यांनी १७ जुल ै रोजी शेतात किटकनाशक औषध प्राशन केले. त्यांना तातडीने उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले; परंतु २० जुलै रोजी उपचारादम्यान त्यांचा मृत्यू झाला. शेतकरी उल्हास जाधव यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

टॅग्स :washimवाशिमfarmer suicideशेतकरी आत्महत्या