लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) : कारंजा येथील रहिवासी तथा मेघालय राज्यातील शिलाँग येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत जवान सुनील विठ्ठलराव धोपे यांच्या मृत्यूमागे घातपात असून याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी १७ सप्टेंबर रोजी विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्यावतीने कारंजा बंद पाळण्यात आला.कर्तव्याच्या ठिकाणी कार्यरत असताना सुनील धोपे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे सहकाºयांना १५ सप्टेंबर रोजी निदर्शनास आले होते. मृत्यूमागे घातपात असल्याचा आरोप करीत शहीद धोपे यांच्या कुटुंबियांनी १६ सप्टेंबरला कारंजा शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. याप्रकरणी सविस्तर चौकशी होण्याच्या मागणीसाठी विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी सोमवारी कारंजा बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार, सोमवारी सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी सकाळच्या सुमारास शहरातून मोटारसायकल रॅली काढून व्यावसायिकांना बंद पाळण्याचे आवाहन केले. शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून, शहीद जवान सुनील धोपे यांच्या मृत्यूप्रकरणी सविस्तर चौकशी करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.
शहीद जवान धोपे मृत्यूप्रकरण; चौकशीच्या मागणीसाठी कारंजा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 14:35 IST
सुनील विठ्ठलराव धोपे यांच्या मृत्यूमागे घातपात असून याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी १७ सप्टेंबर रोजी विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्यावतीने कारंजा बंद पाळण्यात आला.
शहीद जवान धोपे मृत्यूप्रकरण; चौकशीच्या मागणीसाठी कारंजा बंद
ठळक मुद्देघातपात असल्याचा आरोप करीत शहीद धोपे यांच्या कुटुंबियांनी १६ सप्टेंबरला कारंजा शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली.चौकशी होण्याच्या मागणीसाठी विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी सोमवारी कारंजा बंदचे आवाहन केले होते.सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी सकाळच्या सुमारास शहरातून मोटारसायकल रॅली काढून व्यावसायिकांना बंद पाळण्याचे आवाहन केले.