शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जलकुंभात आढळला मृतावस्थेतील कुत्रा; पाणीनमुने तपासणीसाठी पाठविले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 12:47 IST

मृतावस्थेतील कुत्रा आढळून आल्यानंतर, २१ जून रोजी सकाळपासूनच जलशुद्धीकरण केंद्राची स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम) : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वाईगौळ येथील २८ गावे पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ असलेल्या जलकुंभात २० जून रोजी मृतावस्थेतील कुत्रा आढळून आल्यानंतर, २१ जून रोजी सकाळपासूनच जलशुद्धीकरण केंद्राची स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. दरम्यान, या जलकुंभातील पाणी नमुने तपासणीसाठी पाठविले असून, पशूसंवर्धन विभागाकडून कुत्र्याच्या शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाईची पुढील दिशा ठरणार आहे.मानोरा तालुक्यातील वाईगौळ येथे महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या २८ गावे पाणी पुरवठा योजनेंतर्गत जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळ एक जलकुंभ बांधण्यात आला असून, त्यातील पाणी ग्रामस्थांना नळ योजनेद्वारे सोडले जाते. गुरूवार, २० जून रोजी  सकाळी वाईगौळ येथील किशोर प्रकाश राठोड या युवकाने सहज म्हणून जलशुद्धीकरण केंद्रावर जावून पाहणी केली असता त्याला पंपाखालील जलकुंभात काळ्या रंगाचा कुत्रा मृतावस्थेत पडून असल्याचे दिसून आले. याप्रकाराबद्दल नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून, दोषींविरूद्ध कारवाईची मागणी पुढे आली. शुक्रवारी सकाळपासूनच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकारी, कर्मचाºयांनी जलशुद्धीकरण केंद्रासभोवताल स्वच्छता मोहिम राबविली.  ज्या टाकीत कुत्रा पडला होत्या, त्या टाकातील संपूर्ण पाणी काढून शुद्धीकरण कºयात आले तसेच जलशुद्धीकरण केंद्राचेही शुद्धीकरण केले. या परिसरातील झाडेझूडपे हटविण्यात आली तसेच संपूर्ण परिसरातील स्वच्छता केली. २८ गावातील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यात आल्याचे शाखा अभियंता व्ही. जे. खराटे यांनी सांगितले. ज्या टाकीत कुत्रा आढळून आला, त्या टाकातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत तसेच कृत्र्याचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील दिशा ठरणार आहे. पाण्याच्या टाकीत साचलेला गाळ काढण्यात आला. गाळाचा ढिग पाहून गत कित्येक वर्षांपासून टाक्याची साफसफाई केली नसल्याचे दिसून येते. वाईगौळ येथील या प्रकाराची पुनरावृत्ती अन्यत्र होऊ नये यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील जलकुंभाची स्वच्छता मोहिम राबविणे आवश्यक ठरत आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी