शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दगड-उमरा परिसरात दिवसाढवळ्या वन्यप्राण्यांची शिकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 16:18 IST

दुपारच्या वेळी काही मंडळींनी गावालगतच जाळे लावून सशांची शिकार केल्याचे दिसून आले.

लोकमत न्युज नेटवर्क दगड उमरा  (वाशिम) : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राण्यांच्या शिकारीत वाढ झाल्याचे दिसून येत होते. वनविभागाने काही प्रकरणात कारवाई केली असली तरी, यावर नियंत्रणासाठी प्रभावी उपाय योजना करण्यात येत नव्हत्या. वनविभागाची उदासीनता उघड करण्यासाठी लोकमतने रविवारी वाशिम तालुक्यातील दगड उमरा शिवारात स्टिंग आॅपरेशन राबविले. त्यात काही लोकांनी अगदी गावालगतच्या शिवारातच शिकारीसाठी जाळे बांधल्याचे आणि एक दोन सशांची शिकारही केल्याचे दिसून आले.कोरोना विषाणू संसर्गासाठी लॉकडाऊन जारी असताना उद्योगधंदे, बंद असल्याने काही मंडळी उदरनिर्वाहासाठी वन्यप्राण्यांची शिकार करीत असल्याची माहिती लोकमतला मिळाली होती. मंगरुळपीर येथील वाईल्डलाईफ कन्झर्वेशन या वन्यजिवांच्या संरक्षणासाठी धडपडणाºया संघटनेने या संदर्भात पारधीतांड्यात जाऊन पारधी बांधवांना मार्गदर्शन करीत त्यांना शिकारीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्नही केला. वनविभागाकडून काही प्रकरणात कारवाईसुद्धा करण्यात आली. त्यानंतरही जिल्ह्यातील वनपरिक्षेत्रात हरीण, काळविट, निलगाय, रानडुक्कर आदि वन्यप्राण्यांसह मोर, तितर, बटेर, लाव्हरी, या पक्ष्यांची शिकार होत असल्याचे आणि दगड उमरा शिवारात परगावातील काही मंडळी शिकारीचा व्यवसायच करीत असल्याची माहिती लोकमतला मिळाली. त्यावरून हा प्रकार प्रत्यक्ष उघडकीस आणण्यासाठी लोकमतने दगड उमरा शिवारात रविवारी स्टिंग आॅपरेशन राबविले. त्यात अगदी दिवसाला दुपारच्या वेळी काही मंडळींनी गावालगतच जाळे लावून सशांची शिकार केल्याचे दिसून आले. वन्यप्राणी पकडण्यासाठी जाळीसह कुत्र्यांचा वापर दगड उमरा शिवारात गत दोन चार दिवसांपासून वन्यप्राण्यांची शिकार होत असून, वन्यप्राणी, पक्षी पकडण्यासाठी शिकारी मंडळी फासे जाळीसह कुत्र्यांचाही आधार घेत असल्याचे दिसून आले. दिवसाढवळ्या गावालगतच्याच शेतशिवारात त्यांच्याकडून वन्यप्राण्यांची शिकार केली जात असतानाही वनविभाग याबाबत अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :washimवाशिमwildlifeवन्यजीव