शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

नुकसानग्रस्त ६८ हजार शेतकरी मदतीपासून वंचित

By सुनील काकडे | Updated: May 13, 2023 17:56 IST

पिकांची अतोनात हानी : नैसर्गिक संकटांपुढे बळीराजा हतबल

वाशिम : एरव्ही दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासून कडक ऊन्ह तापते. यंदा मात्र वातावरणात बदल होऊन एप्रिलच्या अखेरपर्यंत अधूनमधून ढगाळी वातावरण निर्माण होण्यासह अवकाळी पाऊस कोसळला. यादरम्यान गारपीट होऊन पिकांची अतोनात हानी झाली. त्यापूर्वीही निसर्गाने लहरीपणा दाखविल्याने वर्षभरात २ लाख ४० हजार ६७५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यापैकी १ लाख ७२ हजार ६४२ शेतकऱ्यांना मदत मिळाली; तर ६८ हजार ३३ शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित आहेत.

जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात गहू, मूग, तूर, उडिद, कापूस, सोयाबीन, ज्वारी आदी पिके घेतली जातात. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, त्यांनी विविध फळांच्या बागा विकसीत केल्या; तर काही शेतकऱ्यांनी भाजीपाला उत्पादनाच्या माध्यमातून आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र, नैसर्गिक संकटांपुढे शेतकरी पुरते हतबल होत आहेत. यंदा तर भर उन्हाळ्यात ढगाळी वातावरण कायम राहण्यासह जोरदार स्वरूपात अवकाळी पाऊस कोसळला. यादरम्यान मोठ्या प्रमाणात गारपीट देखील झाल्याने प्रामुख्याने फळबागा आणि भाजीपालावर्गीय पिकांना जबर फटका बसला. काही शेतकऱ्यांच्या शेतातील गहू पिकाचेही यामुळे नुकसान झाले. त्यापूर्वीही निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या विविध पिकांचे नुकसान झाले. मात्र, मदत मिळण्यास विलंब होत असल्याने त्यांच्यातून नाराजी व्यक्त होत आहे.१ लाख ७२ हजार शेतकऱ्यांना मिळाली मदतजुलै २०२२ ते ८ मे २०२३ या कालावधीत अतिवृष्टी, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील २ लाख ४० हजार ६७५ शेतकऱ्यांच्या १ लाख ९३ हजार ६२७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे दर्शवून नुकसान भरपाईपोटी २६५ कोटी ४५ लाख रुपयांची आवश्यकता असल्याचा अहवाल शासनाकडे पाठविला. त्यापैकी आतापर्यंत १ लाख ७२ हजार ६४२ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात १९७ कोटी २३ लाख रुपये वर्ग करण्यात आले; मात्र ६८ हजार ३३ शेतकरी मदतीपासून अद्याप वंचित असून ६८ कोटी २२ लाखांचा निधी संबंधितांच्या बॅंक खात्यात जमा होणे आवश्यक आहे.

जुलै २०२२ पासून ८ मे २०२३ पर्यंत विविध स्वरूपातील नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त १ लाख ७२ हजार ६४२ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात मदतनिधी जमा करण्यात आला असून उर्वरित ६८ हजार ३३ शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.- एस.एम. तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Farmerशेतकरी