शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम पोलीस मुख्यालयात ‘सायबर जाणीवजागृती कार्यक्रम’ : विविध विषयांवर मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 16:16 IST

वाशिम : संगणकाने सद्या सर्वच क्षेत्रात क्रांती केली आहे; परंतु चुकीच्या पद्धतीने आपणच आपली वैयक्तिक माहिती जाहीर करित असल्याने फसवणूकीची अनेक प्रकरणे उघड होत आहेत.

ठळक मुद्देसंगणकीय तंत्रज्ञान चांगले असले तरी त्याचा वापर जपूनच करायला हवा, असे प्रतिपादन अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वप्ना गोरे यांनी केले. सहायक पोलिस निरीक्षक अजयकुमार वाढवे यांनी विविध विषयांची उदाहरणे देऊन उपस्थितांच्या प्रश्नांचे निराकरण केले.

वाशिम : संगणकाने सद्या सर्वच क्षेत्रात क्रांती केली आहे; परंतु चुकीच्या पद्धतीने आपणच आपली वैयक्तिक माहिती जाहीर करित असल्याने फसवणूकीची अनेक प्रकरणे उघड होत आहेत. दरम्यान, संगणकीय तंत्रज्ञान चांगले असले तरी त्याचा वापर जपूनच करायला हवा, असे प्रतिपादन अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वप्ना गोरे यांनी केले.जिल्हा पोलीस दल व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, २३ जानेवारी रोजी नवीन पोलीस मुख्यालयात ‘सायबर जाणीवजागृती कार्यक्रम’ पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. इंटरनेटच्या माध्यमातून बँकींग व आॅनलाईन व्यवहार, फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप या समाज माध्यमांवर आपली वैयक्तिक माहिती शेअर करताना कोणती काळजी घेणे गरेचे आहे. तसेच समाज माध्यमातील चुकीच्या प्रवृत्तीचा व आमीषाला बळी पडून आपले नुकसान करू नये. आॅनलाईन बँकींग व्यवहार करित असताना आपली वैयक्तिक माहिती, ई-मेल, खाते क्रमांक, क्रेडीट-डेबीट कार्ड, पासवर्ड, पीन आदी गोपनिय माहिती कुणालाही शेअर करू नका. क्रेडिट, डेबीट कार्ड स्वत: स्वाईप करा, कुणाकडेही देवू नका. सायबर गुन्हेगार या माहितीच्या आधारे फसवणूक करून आपल्या खात्यातील रक्कम काढू शकतात. त्यामुळे एकूणच या सर्व बाबींचा वापर करताना चोखंदळ राहायला हवे, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी सहायक पोलिस निरीक्षक अजयकुमार वाढवे यांनी विविध विषयांची उदाहरणे देऊन उपस्थितांच्या प्रश्नांचे निराकरण केले. कार्यक्रमास पोलिस उपअधिक्षक (गृह) किरण धात्रक, पोलिस निरीक्षक शिवाजी ठाकरे, पोलिस नायक प्रदिप डाखोरे, अमोल काळमुंदळे, प्रशांत चौधरी, सहायक जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप आदिंची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिस