शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या कामात डेरेदार वृक्ष होताहेत जमीनदोस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 14:00 IST

रस्त्याच्या दुतर्फा नैसर्गिकरित्या वाढलेली आणि शेकडो वर्षांपासून वाटसरूंना सावली देणाऱ्या डेरेदार वृक्षांची सर्रास कत्तल केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : अकोला ते आर्णी या राष्ट्रीय महामार्गाचे काम अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये सद्या जोरासोरात सुरू आहे. महामार्ग निर्मितीदरम्यान मात्र जुन्या रस्त्याच्या दुतर्फा नैसर्गिकरित्या वाढलेली आणि शेकडो वर्षांपासून वाटसरूंना सावली देणाऱ्या डेरेदार वृक्षांची सर्रास कत्तल केली जात आहे. यामुळे वृक्षप्रेमींमधून नाराजीचा सूर उमटत आहे.मानोराकडून दिग्रस, मंगरूळपीर आणि कारंजाकडे जाणाºया रस्त्याच्या दुतर्फा हजारो वृक्षांची लागवड त्यावेळच्या रस्ता बांधकाम करणाºया यंत्रणेने करून रस्त्यावरून होणाºया वायू प्रदूषणाला आळा घालण्याचा दुरदर्शी उपाय करण्यात आला. अकोला ते आर्णी या राष्ट्रीय महामार्ग निर्मितीदरम्यान मात्र तीच शेकडो वर्षांपासून उभी असलेली झाडे तोडून टाकली जात असल्याने रस्ता बोडखा झाल्याचे दिसून येत आहे.मनोरा शहरात अनेक वर्षे वाटसरूंना शितल छाया देणारे स्टेट बँकेनजिकचे डेरेदार निमवृक्षही या कामादरम्यान कापले जाणार असल्याने वृक्षप्रेमींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.अकोला ते आर्णी या राष्ट्रीय महामार्ग निर्मितीदरम्यान रस्ता रुंदीकरण करण्यासाठी अडचणीचे ठरत असलेले वृक्ष तोडण्याची रितसर परवानगी संबधित कंत्राटदारांनी वनविभागाकडून घेतलेली आहे. रस्त्याची कामे पूर्ण झाल्यानंतर तेवढीच झाडे रस्त्याच्या कडेला नव्याने लावण्यात यावीत, असे बंधन कंत्राटदारांना घालून देण्यात आले आहे. तथापि, तोडलेली झाडे लहान-मोठ्या स्वरूपातील आहेत. नव्याने लावण्यात येणारी झाडे मोठी व्हायला बरीच वर्षे लागणार आहेत; मात्र त्यास सद्यातरी कुठलाच पर्याय नाही.- चेतन राठोडवनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभाग, मानोरा

 

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराhighwayमहामार्ग