शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पीककर्ज ‘एटीएम’ कार्डच्या कचाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 15:16 IST

वाशिम : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाची प्रक्रिया बँकांमार्फत सुरू झाली असली तरी, तथापि, पीककर्जाच्या रकमेची उचल ही किसान के्रडीट कार्डद्वारेच करण्याची अट घालण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाची प्रक्रिया बँकांमार्फत सुरू झाली असली तरी, तथापि, पीककर्जाच्या रकमेची उचल ही किसान के्रडीट कार्डद्वारेच करण्याची अट घालण्यात आली आहे. त्यात हजारो शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड मिळालेच नाहीत, तर हजारो शेतकºयांचे एटीएम कार्ड बंद पडले आहेत. त्यामुळे या शेतकºयांचा खरीप हंगाम वांध्यात सापडला आहे.शेतकºयांना वेळेवर आणि सहजपणे विविध कर्ज उपलब्ध करण्यासह, आकस्मिक खर्चाच्यावेळी सहज रक्कम मिळावी म्हणून शासनाने किसान क्रेडीट कार्ड योजना अमलात आणली आहे. या योजनेमुळे शेतकºयांना बँकांचे व्यवहार बंद असले तरी, खात्यात जमा झालेली पीककर्जासह इतर योजनांच्या अनुदानाची रक्कम काढणे शक्य होणार आहे. तथापि, यंदाच्या पीककर्ज वितरणात ही योजना अडचणीची ठरत आहे. वाशिम जिल्ह्यात विविध बँकांचे मिळून एकूण १ लाख १२ हजार ५८५ शेतकरी असून, त्यापैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या खातेदार शेतकºयांची संख्या १ लाख ५८ हजार ३६१ एवढी आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकरी पीककर्ज काढण्याच्या तयारीत असून, त्यांनी बँकेकडे कागदपत्रेही सादर केली आहेत. त्यातील बहुतांश शेतकºयांना पीककर्जही मंजूर झाले आहे. तथापि, पीककर्जातील रक्कम ही किसान के्रडीट कार्डद्वारेच काढण्याची अनुमती आहे. आता शेतकºयांना खरीप हंगामाच्या तयारीसाठी तातडीने पैशांची गरज आहे. त्यामुळे शेतकरी बँकांकडे धाव घेत आहेत. तथापि, जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँकांत खाते असलेल्या एकूण १ लाख ५८ हजार ३६१ शेतकºयांपैेकी केवळ ९९ हजार २६८ शेतकºयांचे किसानकार्ड बँकांना प्राप्त झाले आहेत, तर त्यातील केवळ २८ हजार ९८२ शेतकºयांचे किसान कार्ड क्रियाशील झाले असून, अद्याप ४३ हजार ८९० शेतकºयांचे किसान कार्ड अप्राप्तच आहेत. त्यामुळे या शेतकºयांना आता किसान कार्ड मिळाल्यानंतर पीककर्जाची रक्कम काढता येणार आहे.दरम्यान यावर्षी १५३० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. मध्यवर्ती बँकेचा अपवाद वगळता उर्वरीत राष्ट्रीयकृत बॅकेने अद्याप पीककर्ज वाटप सुरू केले नसल्याने शेतकºयांमधून रोष व्यक्त होत आहे.

शासनाच्या निर्देशानुसार पीककर्जाची निम्मी रक्कम उचलण्यासाठी विड्रॉल स्लीपचा पर्याय ठेवला आहे.; परंतु निम्म्या रकमेसाठी किसान क्रेडीट कार्डचा आधार आवश्यक आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खातेदार शेतकºयांचे किसान कार्ड प्रलंबित असल्याबाबत आपण त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधून तात्काळ प्रक्रिया राबविण्याची सुचना केली असून, शेतकºयांची अडचण दूर करण्यासाठी येत्या ८ दिवसांत सर्व खातेदारांना किसान कार्डचे वितरण होईल.-दत्तात्रय निनावकरव्यवस्थापक जिल्हाअग्रणी बँक वाशिम.

वाशिम तालुक्यातील ४ हजार सभासदांसाठी किसान क्रेडीट कार्डची मागणी जिल्हा बँकेकडे करण्यात आली आहे; परंतु केवळ ३०० कार्ड प्राप्त झाले असून, किसान कार्ड मिळत नाही, तोपर्यंत निम्मी रक्कम विड्रॉल स्लीपद्वारे देण्यात येईल. उर्वरित निम्मी रक्कम किसान कार्डद्वारेच काढावी लागणार आहे.- एस. पी. तलवारेवरिष्ठ निरीक्षकजिल्हा मध्यवर्ती बँक, वाशिम

वाशिम तालुक्यात केवळ ३०० शेतकºयांना कार्डशासनाने पीककर्ज अथवा इतर योजनांतील रक्कम काढण्यासाठी किसान के्रडीटकार्ड योजना आणली असली तरी, हे कार्ड मिळण्यास विलंब होत आहे. त्यात वाशिम जिल्ह्यातील एकट्या वाशिम तालुक्यात केव्ळ ३०० शेतकºयांना नवे एटीएम प्राप्त झाले, तर ४००० हजार एटीएम कार्ड प्रलंबित असून, कर्ज मंजूर झालेल्या हजार शेतकºयांचे एटीएम कार्ड बंद पडले आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले असून, बँकेने तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.निम्मी रक्कम विड्रॉल स्लीपद्वारेशेतकºयांच्या सुविधेसाठी किसान के्रडीट कार्ड योजना राबविण्यास सुरुवात केली. ही बाब शेतकºयांच्या सोयीची असली तरी, क्रेडीटकार्डच मिळाले नसल्याने शेतकºयांना अडचणी येत आहेत. शेतकºयांची तातडीची अडचण दूर करण्यासाठी निम्मी रक्कम विड्रॉल स्लीपद्वारे काढण्याची अनुमती शेतकºयांना देण्यात आली आहे. तथापि, विड्रॉलसाठी बराच विलंब लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. त्यातच पीककर्ज वाटपाची प्रक्रिया संथ असल्याने शेतकºयांना थेट विड्रॉलद्वारे रक्कम मिळण्यासही विलंब होणार असल्याने शेतकºयांचा खरीप हंगाम अडचणीत सापडला आहे.

टॅग्स :washimवाशिमCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी