शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा अधिकार बजावा; राज ठाकरेंनी केले आवाहन
2
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
3
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
4
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
6
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
7
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
8
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
9
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
11
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
12
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
13
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
14
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
15
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
16
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
17
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
18
मतदानाच्या आदल्या दिवशी विनोद तावडे-राज ठाकरे भेट; मराठी मतांच्या बेरजेसाठी भेट झाल्याची चर्चा 
19
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
20
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही

पीक विम्यापोटी कंपन्यांना द्यावे लागतील ४५० कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 2:00 PM

ज्यांनी पिक विमा नाही भरला त्या शेतकºयांच्या मदतीचा अंदाज मात्र अद्याप प्रशासनाला काढता आला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हयात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानामुळे पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रशासनाने आकडेमोड केली असून. नुकसानग्रस्त शेतकºयांना पीकविम्याचा लाभ देण्यासाठी अंदाजे ४५० कोटी रुपयांच्या निधीची गरज भासणार आहे. दरम्यान, ज्यांनी पिक विमा नाही भरला त्या शेतकºयांच्या मदतीचा अंदाज मात्र अद्याप प्रशासनाला काढता आला नाही.वाशिम जिल्ह्यात २७ आॅक्टोबरपासून अवकाळी पावसाने थैमान घालत शेतीपिकांचे अतोनात नुकसान केले. या नुकसानापोटी शेतकºयांना आर्थिक मदत मंजूर करण्यासाठी शासनाने प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यात पीकविमा भरणाºया आणि न भरणाºया शेतकºयांच्या नुकसानाचीही पाहणी करण्याच्या सुचना होत्या, तर नुकसानग्रस्त शेतकºयांना नुकसानाचा तक्रार अर्ज पीक विमा कंपनी आणि कृषी विभागाकडे करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. या प्रक्रियेला २८ आॅक्टोबरपासून सुरुवात झाली. प्रत्यक्षात जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात २ लाख ९५ हजार २९० शेतकºयांनी २ लाख ४ हजार १०० हेक्टर क्षेत्रासाठी १७ कोटी ६२ लाख ९३ हजार २१४ रुपये पिकविम्यापोटी भरले आहेत. पिकविमा उतरविणाºया शेतकºयांत ८५ हजार ३९५ कर्जदार शेतकरी असून, २ लाख ९ हजार ८९५ शेतकरी बिगर कर्जदार आहेत. तर जिल्ह्यात ३१ आॅक्टोबरपर्यंत ८६ हजार ४३ शेतकºयांनी पीक विम्यापोटी नुकसानभरपाई मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. या अर्जांच्या आधारे कृषी विभाग व पीक विमा कंपनीने नुकसानभरपाई म्हणून मदत देण्यासाठी केलेल्या आकडेमोडीनुसार आजवरच्या अर्जांसाठी अंदाजे ३६९ कोटी ९८ लाख ४९ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. तथापि, अद्याप अनेक शेतकºयांच्या तक्रारी पीक विमा कंपनीकडे प्राप्त झालेल्या नसून, जिल्ह्यातील पीकविमाधारक शेतकरी आणि नुकसानाचे प्रमाण गृहित धरता पीकविम्यापोटी नुकसानभरपाई म्हणून अ‍ॅग्रीकल्चर विमा कंपनीला वाशिम जिल्ह्यात जवळपास ४५० कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रक्कमही शेतकºयांना अदा करावी लागण्याची शक्यता पीकविमा कंपनी प्रतिनिधी आणि प्रशासनाने वर्तविली आहे. जिल्ह्यात शेतकºयांच्या अडचणी लक्षात घेता अद्यापही तक्रारी नोंदवून घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येत असून, पीकविमा कंपनीच्या तालुका समन्वयकांसह तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शेतकºयांचे अर्ज स्विकारण्यात येत आहेत. सर्व नुकसानग्रस्त शेतकºयांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर शेतकºयांच्या क्षेत्रानुसार नुकसानभरपाई पोटी पीकविमा मंजूर करण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. शुक्रवारी तलाठी, कृषी सहाय्यकांसह प्रशासकीय कर्मचाºयांच्या पथकांकडून प्रत्यक्ष पीक नुकसानाच्या पाहणीला पुन्हा सुरुवात करण्यात आली. त्यात पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींचाही समावेश असून, हे पथक गावोगावी फिरुन शेतांना प्रत्यक्ष भेटी देत पीक नुकसानाच्या नोंदी घेत आहे. दरम्यान, आता तालुका कृषी कार्यालयावर अर्ज स्विकारणे बंद होणार असून, शनिवारपासून शेतकºयांना त्यांनी जया बँकेत पीकविमा भरला त्या बँकेकडे अर्ज करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)काढणी पश्चात सोयाबीनचे नुकसान अधिकजिल्ह्यात २७ आॅक्टोबरपासून आलेल्या जोरदार अवकाळी पावसाने शेताम्धील जवळपास सर्वच पिकांचे नुकसान केले. त्यात सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी, हळद, मका या पिकांसह पपई, डाळींब, संत्रा, लिंबू या पिकांच्या नुकसानाचाही समावेश आहे. तथापि, शेतात उभ्या पिकांपेक्षा अधिक नुकसान काढणीपश्चात सोयाबीन पिकाचेच झाले आहे. पीकविमा कंपनी आणि कृषी विभागाकडे शेतकºयांनी दाखल केलेल्या तक्रार अर्जांवरूनच हे स्पष्ट झाले आहे. सोयाबीनच्या एकूण नुकसानात काढणीपश्चात सोयाबीनच्या नुकसानाचे प्रमाण जवळपास ९० टक्के आहे. जिल्ह्यातील ७० टक्क्यांहून अधिक शेतकºयांनी सोयाबीनची काढणी करून शेतात सुड्या लावून ठेवल्या होत्या किंवा शेतात जागेवरच सोयाबीनची कापणी करून ठेवली होती. सुड्या लावून ठेवलेल्या सोयाबीनच्या काढणीसाठी बहुतांश शेतकरी मळणीयंत्राची तजवीज करण्याच्या प्रयत्नात होते, तर कापणी करून ठेवलेले सोयाबीन चांगले सुकण्याची प्रतिक्षा काही शेतकरी करीत होते. अर्थात हे पीक शेतकºयांच्या हाती आले होते; परंतु २७ आॅक्टोबरच्या सायंकाळपासून अवकाळी पावसाने जिल्ह्यात आकस्मिक हजेरी लावल्याने शेतकºयांना सोयाबीन वाचविण्याची संधीच मिळाली नाही. अनेक शेतकºयांनी सुडीवर टाकलेल्या ताडपत्र्याही वादळी वाºयामुळे उडून गेल्याने ते सोयाबीनही खराब झाले.तक्रारीच्या अर्जांची करावी लागणार छानणीजिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानापोटी पीक विमा मिळण्यासाठी शेतकºयांनी २८ आॅक्टोबरपासून पीक विमा कंपनीसह कृषी विभागाकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली. दोन दिवसांत ५० हजारांवर शेतकºयांचे अर्ज पीक विमा कंपनी आणि कृषी विभागाकडे प्राप्त झाले असतानाच शासनाने सर्वच मंडळातील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले, तर नुकसानग्रस्त शेतकºयांनाही पंचनाम्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यातील सहाही केंद्रावर कृषी विभागाचे अधिकारी आणि पीक विमा कंपनीच्या तालुका समन्वयकांकडे नुकसानाचे अर्ज करण्यासाठी शेतकºयांची तोबा गर्दी उसळली. अगदी रात्री आठ वाजेपर्यंतही या केंद्रावर शेतकºयांची गर्दी दिसत होती. यात पीक विमाधारक शेतकºयांसह पीक विमा न भरलेल्या शेतकºयांनही नुकसानाचे अर्ज सादर केले. त्यामुळे अर्जाच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, आता पीक विमा कंपनी आणि कृषी विभागाला या अर्जांची छानणी करून पीक विमा भरणारे शेतकरी व पीक विमा न भरणारे शेतकरी यांचे अर्ज वेगवेगळे करावे लागणार आहेत. या अर्जांच्या छानणीनंतरच प्रत्यक्ष पीकविमा भरणाºयांचे आणि पीक विमा न भरणाºयांचे अर्ज किती हे स्पष्ट होणार असून, त्यानंतरच पीकविमाधारक शेतकºयांच्या आर्थिक मदतीचा नेमका अंदाज येणार आहे.

टॅग्स :washimवाशिमCrop Insuranceपीक विमाagricultureशेतीFarmerशेतकरी