शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

खासदार-आमदारांमधील वादात कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 05:49 IST

Crime News : २६ जानेवारी रोजी जिल्हा नियोजन भवनात खासदार गवळी आणि आमदार पाटणी यांच्यात वाद झाला हाेता. दोघांनी शहर पोलीस स्टेशनला परस्परविरोधी तक्रारी दिल्याने गुन्हे दाखल करण्यात आले

वाशिम : येथील नियोजन भवनात खासदार भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामध्ये झालेल्या शाब्दिक वादातून पोलिसांनी आतापर्यंत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांविरुद्ध ७ दखलपात्र, तर अदखलपात्र स्वरूपाचे ४ गुन्हे दाखल केले, तसेच ७४ जणांना स्वघरी स्थानबद्ध करण्याचा आदेश देण्यात आला असून, २१० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी रविवारी स्पष्ट केले.२६ जानेवारी रोजी जिल्हा नियोजन भवनात खासदार गवळी आणि आमदार पाटणी यांच्यात वाद झाला हाेता. दोघांनी शहर पोलीस स्टेशनला परस्परविरोधी तक्रारी दिल्याने गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, लोकप्रतिनिधींमधील या शाब्दिक वादाचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. काही ठिकाणी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने गुन्हे दाखल करण्यात आले.पोलीस अधीक्षक परदेशी यांच्या आदेशानुसार वाशिम, कारंजा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील ७४ इसमांना स्थानबद्ध करण्याचे प्रस्ताव संबंधित उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर केले होते. या प्रकरणात उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी एकतर्फी आदेश देऊन ७४ इसमांना स्वघरी स्थानबद्धतेचे आदेश दिला. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध सध्याच्या दाखल गुन्ह्यांवरून हद्दपारी, मकोका आदी कडक कारवाई करण्याच्या सूचना अधीक्षकांनी दिल्या आहेत. पोलीस स्टेशन स्तरावरून प्रतिबंधात्मक कार्यवाहीचे प्रस्ताव मागवून २१० जणांवर कारवाई करण्यात आली.

टॅग्स :washimवाशिमPoliticsराजकारण