शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्ह्यांचा आलेख चढता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 16:18 IST

Police Station, Crime News गुन्ह्यांच्या कारणांमध्ये कोरोना काळात वाढलेली बेरोजगारी हे एक महत्त्वाचे कारण ठरल्याचे दिसत आहे.  

ठळक मुद्देआसेगाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात ५२ गावांचा समावेश होतो. २०२० मध्ये गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे अधिकृत माहितीवरून स्पष्ट झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव (वाशिम): मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे या संदर्भातील अधिकृत माहितीवरून स्पष्ट झाले आहे. विनयभंग, महिला अत्याचार, हत्या, हत्येच्या प्रयत्नांसह घरफोडी आणि हाणामारीच्या घटनांत प्रामुख्याने लक्षणीय वाढ झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.मंगरुळपीर पोलीस उपविभागांतर्गत आसेगाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात ५२ गावांचा समावेश होतो. या गावांत कोरोना लॉकडाऊन काळातच गुन्ह्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली पोलिसांकडून घेतलेल्या माहितीनुसार २०१९ या वर्षात आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत एक हत्या,  हत्येचा प्रयत्न १, महिला अत्याचाराची १, घरफोडी १, चोºया ४, दंगे २, फूस लावून पळविल्याच्या ५, हाणामारीच्या २७, विनयभंग २, अपघाती मृत्यू १, महिला छळाच्या ९, जुगार ५२, अवैध दारूविक्री १४५, तर इतर गुन्ह्यांच्या ४८ घटना घडल्या. या उलट २०२० मध्ये त्यात ३५ टक्के वाढ होऊन २ हत्या,  हत्येचा प्रयत्न ३, महिला अत्याचार २, जबरी चोरी १, घरफोडी ३, चोºया २, दंगे ६, फूस लावून पळविल्याच्या ३, हाणामारीच्या ५८, कर्मचाºयांवर हल्ला ३, विनयभंग ११, अपघाती मृत्यू ४, महिला छळाच्या १२, जुगार ५६, अवैध दारूविक्री १५०, तर इतर गुन्ह्यांच्या ७४ घटना घडल्या. प्रामुख्याने कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून आले.  

पोलीस स्टेशन आसेगाव अंतर्गत ५२ गावांतील गुन्ह्यांचा विचार करता केवळ पोलीस स्टेशनचे मुख्यालय आसेगाव वगळता इतर सर्वच गावांत लहान मोठे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडले आहेत. गुन्ह्यांच्या कारणांमध्ये कोरोना काळात वाढलेली बेरोजगारी हे एक महत्त्वाचे कारण ठरल्याचे दिसत आहे.  -किशोर खंडार,पोलीस उपनिरीक्षक आसेगाव

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिस