शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अतिपावसाने उद्धस्त झाली ४० हेक्टर क्षेत्रातील कपाशी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 17:34 IST

Agriculture News Washiim पात्या आणि बोंडेही गळून पडल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी (वाशिम): मानोरा तालुक्यातील इंझोरी महसूल मंडळात यंदा कपाशीच्या क्षेत्रात वाढ झाली. त्यामुळे या पिकातून चांगले उत्पादन मिळण्याचा विश्वास शेतकºयांना असताना सप्टेंबरमध्ये सततच्या पावसामुळे कपाशीला फटका बसून, जवळपास ४० हेक्टर क्षेत्रातील कपाशी शेतात पाणी साचल्याने उद्धस्त झाली आहे. या पिकाच्या पात्या आणि बोंडेही गळून पडल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.  यंदाच्या खरीप हंगामात इंझोरी महसूल मंडळात निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकºयांना फटका बसला. त्यात दुबार, तिबार पेरणी काही शेतकºयांना करावी लागली. त्यामुळेच शेतकºयांनी सोयाबीनऐवजी कपाशीच्या पिकाला यंदा पसंती दिली होती. कृषी विभागाच्या अहवालानुसार या मंडळात कपाशीचे क्षेत्र २ हजार ४१४ हेक्टर आहे. यातील अनेक शेतकºयांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली, तर काहींनी जूनच्या पहिल्याच पावसानंतर कपाशीची पेरणी केली. हे पीक जुलैपर्यंतच्या पोषक वातावरणामुळे चांगले बहरले. त्यानंतर मात्र आॅगस्टमधील पावसाने या पिकाला फटका बसला. त्या नैसर्गिक आपत्तीतून हे पीक सावरत असतानाच सप्टेंबर महिन्यात सततच्या पावसाचा तडाखा पुन्हा या पिकाला बसला. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचले आणि कपाशीच्या पात्या, बोंडे गळून कपाशी सुकली. जवळपास ४० हेक्टर क्षेत्रातील कपाशी उद्धस्त झाली. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतकºयांना आता या पिकावर केलेला खर्चही वसूल होणे कठीण झाले आहे. तथापि, प्रशासनाने या पीक नुकसानाची पाहणीच अद्याप केली नाही. (वार्ताहर)

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीRainपाऊस