शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
4
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
5
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
6
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
7
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
8
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
9
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
10
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
11
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
12
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
13
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
14
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
15
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
16
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
17
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
18
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
19
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
20
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : संरक्षक किटचा तुटवडा; खासगी डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 10:27 IST

खासगी डॉक्टरांप्रमाणेच आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरेशा प्रमाणात संरक्षक किट उपलब्ध नसल्याने त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाविरोधात लढणाऱ्या खासगी डॉक्टरांप्रमाणेच आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरेशा प्रमाणात संरक्षक किट उपलब्ध नसल्याने त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात यापूर्वी कारंजा येथील दोन खासगी डॉक्टर आल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून संरक्षक किट पुरविण्याची मागणी समोर आली. दरम्यान, कवठळ येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कारंजा येथील एका खासगी डॉक्टरच्या थ्रोट स्वॅब नमुन्याचा अहवाल नेमका कसा येतो, याकडे वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.कोरोनाविरूद्धच्या लढ्यात खºया अर्थाने सरकारी डॉक्टर, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य पर्यवेक्षक याप्रमाणेच खासगी डॉक्टर उतरले असून, स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, हे आरोग्यरक्षक रुग्णांची सेवा करीत आहेत. या आरोग्य रक्षकांना पुरेशा प्रमाणात ‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट’ (पीपीई-संरक्षक कीट) उपलब्ध नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेसचा अपवाद वगळता ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकारी व कर्मचाºयांना पुरेशा प्रमाणात ‘पीपीई’ किट उपलब्ध नाही. ग्रामीण भागातही काही वैद्यकीय अधिकाºयांचा अपवाद वगळता अन्य कर्मचाºयांसाठी पीपीई किटचा तुटवडा आहे. खासगी डॉक्टरांना तर जिल्हा प्रशासनाने ‘पीपीई’ किट उपलब्ध करून दिली नाही. खासगी डॉक्टरांनी स्वत: आपल्या सोयीनुसार तर आयएमए संघटनेने स्व:खर्चातून पीपीई किट उपलब्ध केली. परंतू, अद्यापही काही खासगी डॉक्टरांना सदर किट उपलब्ध नाही. कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कात खासगी डॉक्टर येत असल्याने ग्रामीण ते शहरी अशा सर्वच डॉक्टरांसाठी ‘पीपीई’ किट उपलब्ध करावी, असा सूर डॉक्टरांमधून उमटत आहे.सरकारी डॉक्टरांकडे पीपीई किट उपलब्ध आहेत. अनेक खासगी डॉक्टरांनीदेखील स्वत:हून पीपीई किट उपलब्ध करून घेतली आहे. इंडीयन मेडीकल असोसिएशनने (आयएमए)देखील काही पीपीई किट उपलब्ध करून दिली. जिल्ह्यातील काही शहरातील खासगी डॉक्टरांकडे ही किट उपलब्ध नाही. खासगी डॉक्टरांनी आवश्यक ती खबरदारी घेऊनच रूग्णांची तपासणी करावी. रूग्णांनीदेखील स्वत:हून काळजी घ्यावी.- डॉ. अनिल कावरखेजिल्हाध्यक्ष, आयएमए, वाशिमसर्वच डॉक्टर व कर्मचाºयांना पीपीई किटची आवश्यकता नसते. आवश्यक त्या सरकारी डॉक्टरांना व आरोग्य कर्मचाºयांना पीपीई किट उपलब्ध करून दिली आहे. आवश्यक ती खबरदारी घेऊनच रुग्णांची तपासणी करावी, अशा सूचना सर्वांना दिलेल्या आहेत. खासगी डॉक्टरांसाठी पीपीई किट उपलब्ध करण्याचा प्रयत्न राहिल.- डॉ. अंबादास सोनटक्केजिल्हा शल्य चिकित्सक वाशिम

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या