शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वाशिम जिल्ह्यातील कोरोनाला ५९४ गावांनी वेशीवरच रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 11:32 IST

जिल्ह्यातील ६८२ पैकी ५९४ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश मिळविले तर केवळ ८८ गावांत कोरोनाचा शिरकाव झाला.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी, बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांची गावाबाहेरच आरोग्य तपासणी, क्वारंटीनसाठी शासकीय इमारती उपलब्ध करून देणे यासह अन्य उपाययोजना करीत जिल्ह्यातील ६८२ पैकी ५९४ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश मिळविले तर केवळ ८८ गावांत कोरोनाचा शिरकाव झाला.जिल्ह्यात पहिला रुग्ण हा ग्रामीण भागातच मेडशी (ता.मालेगाव) येथे ३ एप्रिल रोजी आढळून आला होता. लॉकडाऊननंतर बाहेरगावावरून जिल्ह्यातील ग्रामीण भागात जवळपास ६७ हजार नागरीक परतले. गावपातळीवर ग्राम दक्षता समिती, ग्राम सुरक्षा दल स्थापन करून गावांच्या सीमा बंद करणे, आरोग्य तपासणीशिवाय बाहेरच्या व्यक्तीला गावात प्रवेश न देणे, परगावावरून आलेल्या नागरिकांना गावात थेट प्रवेश न देता गावाबाहेर आरोग्य तपासणी करणे, गावात मास्क व सॅनिटायझरचा नियमित वापर करणे, निर्जंतुकीकरण करणे, बी-बियाणे खरेदीसाठी शहरी भागात मोठ्या संख्येने न जाता कृषी विभागाच्या बांधावर खत व बियाणे या उपक्रमात सहभागी होणे यासह शासन, प्रशासनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे या बळावर जिल्ह्यातील ५९४ गावांनी कोरोनाचा गावात शिरकाव होऊ दिला नाही.वाशिम तालुक्यात १२१ गावे असून, १८ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला तर १०३ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश मिळविले. रिसोड तालुक्यात १०० ंपैकी १२ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला तर ८८ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश मिळविले. मालेगाव तालुक्यात ११९ पैकी २१ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला तर ९८ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला नाही. मंगरूळपीर तालुक्याता ११६ पैकी २० गावात कोरोनाबाधित रुग्ण असून उर्वरित ९४ गावात अजून कोरोनाचा शिरकाव झाला नाही. कारंजा तालुक्यात १३४ पैकी १० गावांत कोरोनाचा शिरकाव झाला तर १२४ गावात कोरोनाचा शिरकाव झाला नाही. मानोरा तालुक्यात ९२ पैकी सात गावांत कोरोनाचा शिरकाव झाला तर ८५ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला नाही.

कोरोनामुक्त गावेपोटी, मोहरी, पारवा, शिवणी रोड, मोझरी, कुंभी, कासोळा, रिठद, कवठा, चिखली, व्याड, वाकद, सवड, भर जहॉगीर, कंकरवाडी, चिंचाबाभर, लोणी बु., कुपटा, इंझोरी, पोहरादेवी, शेंदुरजना, जऊळका रेल्वे, किन्हीराजा, अमानी, वसारी, मनभा, धनज, धामणी, काजळेश्वर, अडोळी.

आरोग्य तपासणीवर दिला भरबाहेरगावावरून येणाऱ्या नागरिकांची गावाबाहेरच तपासणी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राच्यावतीने कॅम्प लावण्यात आले. प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्यात आली. कोणतीही लक्षणे आढळून न आलेल्या नागरिकांना गावात प्रवेश दिला. गावात सर्वेक्षण केले.

जनजागृतीवर भरकोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी यासंदर्भात अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविकांनी जनजागृती केली. घरोघरी जाऊन सर्वेक्षण तसेच आरोग्य तपासणी मोहिमेतही सहभाग नोंदविला. मास्क लावणे, हात वारंवार धुणे, फिजिकल डिस्टन्सिंग याबाबत नागरिकांना आवश्यक ते मार्गदर्शनही केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम