शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Corona Virus : दुसरी लाट ओसरली तरी, मुलांबाबत बिनधास्त राहू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 11:01 AM

Corona Virus: पालकांनी मुलांच्या आरोग्याबाबत बिनधास्त न राहता विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी दिला जात आहे.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे दुसरी लाट ओसरत असली तरी पालकांनी मुलांच्या आरोग्याबाबत बिनधास्त न राहता विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी दिला जात आहे.पहिल्या लाटेत १८ ते दहा वर्षांआतील मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला नाही. परंतु दुसऱ्या लाटेत १८ वर्षांआतील मुलांनादेखील कोरोना संसर्ग होत असल्याचे समोर आले आहे. दुसरी लाट ओसरत असल्याने जिल्हावासीयांसाठी ही बाब दिलासादायक ठरत आहे तर दुसरीकडे तिसऱ्या लाटेचा अंदाजही तज्ज्ञांकडून वर्तविला जात असल्याने थोडी धाकधूकही कायम आहे. तिसऱ्या लाटेत १८ वर्षांआतील मुलांना अधिक धोका असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी बालरोगतज्ज्ञांची ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्याला प्राधान्य दिले जात असून, वाशिम जिल्ह्यातही टास्क फोर्ससंदर्भात प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आहे. दरम्यान, पालकांनीदेखील अधिक सतर्क राहून मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक ठरत आहे. दुसरी लाट ओसरत असली तरी पालकांनी गाफील न राहता मुलांच्या पौष्टिक आहारावर भर द्यावा, मुलांना घराबाहेर पाठवू नये, बालकांमधील कोरोना रोखण्यासाठी विविध प्रकारचे नियमित लसीकरण करावे, असा सल्ला बालरोग तज्ज्ञांनी दिला. जिल्ह्यात आरोग्य विभागाच्यावतीने तिसरी लाट लक्षात घेता विशेष खबरदारी घेतली जात आहे. 

अशी घ्यावी बालकांची काळजी !वयाच्या १० वर्षांपर्यंत बालकांचे विविध प्रकारे लसीकरण केले जाते. तिसरी लाट येण्यापूर्वी बालकांना आवश्यक असलेल्या लसी वेळेतच देण्यात याव्या. बालकांना संतुलित, प्रोटीनयुक्त, पौष्टिक आहार द्यावा, नियमित देत असलेले अन्न हेच उत्तम आहे. बाहेरचे अन्न देणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी मुलांना    नेणे टाळावे. पालकांनी आपण स्वत: बाधित होणार नाही, याची         काळजी घ्यावी. फ्रीजचे पाणी, कोल्ड्रिंक्स, पावसात भिजणे         याबाबींपासून लहान मुलांना दूर ठेवावे.

तिसरी लाट येऊच नये, अशी आशा करूया. तिसºया लाटेची शक्यता लक्षात घेता बालकांना फ्ल्यूची लस देणे हा उपाय आहे. दुखणे अंगावर काढू नये. तीन दिवसापेक्षा अधिक काळ बालकाला ताप असल्यास रक्ताच्या विविध चाचण्या कराव्या.                                      - डॉ. हरीष बाहेती, बालरोग तज्ज्ञ, वाशिम

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम