शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांची भेट घेतली; 'तुतारी' सोडून भाजपला पाठिंबा देताच अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
9
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
10
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
11
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
12
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
13
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
14
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
15
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
16
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
17
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
18
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
19
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
20
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप

Corona Vaccine in Washim : दोन दिवसात केवळ ७०० युवकांना मिळाली लस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2021 10:58 AM

Corona Vaccine in Washim: १३० पैकी १२५ केंद्रे बंद असून, पाच केंद्रांत लसीकरण सुरू आहे.

 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : १८ वर्षांवरील नागरिकांना १ मे पासून कोरोना प्रतिबंधक लस दिली जात असून, जिल्ह्यात लसींचा तुटवडा असल्याने गत दोन दिवसांत केवळ ७०० युवकांना लस देण्यात आली. १३० पैकी १२५ केंद्रे बंद असून, पाच केंद्रांत लसीकरण सुरू आहे. येत्या दोन दिवसांत लसींचा साठा उपलब्ध होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांनाच लस दिली जात आहे. या गटातील लाभार्थींची संख्या मोठी असल्याने त्या तुलनेत लसीची मागणीही वाढली आहे. मात्र, सद्य:स्थितीत जिल्ह्यात लसीचा पुरेसा साठा नसल्याने जिल्ह्यातील केवळ कारंजा, मानोरा, मालेगाव, रिसोड व वाशिम अशा पाच केंद्रांत सध्या लसीकरण सुरू आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना लसीकरणाचा मोठा आधार आहे. मागील चार महिन्यांत आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसह ४५ वर्षांवरील सर्वांनाच कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. लसीकरणाला लाभार्थींचा प्रतिसादही मिळत आहे; परंतु गरजेनुसार लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण मोहीम अधूनमधून प्रभावित होत आहे. जिल्ह्यात १३० लसीकरण केंद्रे आहेत. मात्र, लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना पहिल्या दिवशी १ मे रोजी २०६ आणि २ मे रोजी ४६६, असा एकूण ६७२ जणांना लस देण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी अनेक ठिकाणी लस घेण्यासाठी गर्दी झाल्याचे दिसून आले. लसीचे डोस पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने अनेकांना लस घेता आली नाही. त्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूरही उमटला. जिल्ह्यात ४५ वर्षांवरील व्यक्तींची अंदाजे संख्या ३.५० लाखांच्या आसपास असून, २ मे पर्यंत यापैकी १.२४ लाख जणांना लस मिळाली आहे. सद्य:स्थितीत लसींचा पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध नसला, तरी लवकरच साठा प्राप्त होणार असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यात १३० केंद्रांवर लसीकरण केले जात असून, लसींचे डोस प्राप्त होत आहेत. १ मे पासून १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येत आहे. लसीची मागणी नोंदविण्यात आली असून, त्यानुसार दोन, तीन दिवसाआड लसींचा पुरवठा होतो. आणखी एक, दोन दिवसांत लसींचा साठा जिल्ह्याला प्राप्त होणार आहे. १८ ते ४५ वर्षे वयोगटातील ६७२ जणांना दोन दिवसांत लस देण्यात आली आहे. - डॉ. मधुकर राठोडजिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसwashimवाशिम