शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातही कोरोनाची धास्ती; महामंडळाच्या बसमध्ये प्रवाशी बसेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 12:13 IST

रिसोड ते मालेगाव या मार्गावरील बसफेऱ्यांमध्ये फारसे प्रवाशी नसल्याचे गत तीन दिवसात दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव होत असल्याने महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करण्यास प्रवाशी फारसे धजावत नसल्याचे ७ ते ९ जुलैदरम्यान शिरपूरमार्गे रिसोड ते मालेगाव या दरम्यानच्या बसफेऱ्यांमध्ये दिसून आले. मालेगाव व रिसोड बसस्थानकात शुकशुकाटही दिसून आला.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य शासनाने २१ मार्चपासून लालपरीचा चक्काजाम केला होता. दरम्यान, वाशिम जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये असल्याने ८ मे पासून काही अटी व शर्तीवर जिल्हा ते तालुका अशी बससेवा सुरू केली होती. त्यावरही काही बंधने आली. त्यानंतर राज्यात रेड झोन आणि नॉन रेड झोन असे दोन झोन पाडून, २२ मे पासून ‘नॉन रेड झोन’मध्ये बºयापैकी शिथिलता मिळून जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू झाली. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची सोय झाली. दुसरीकडे जून महिन्यातच जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमालिची वाढली. जुलै महिन्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकदेखील सावधगिरीचे पाऊल टाकत असल्याचे दिसून येते. मालेगाव व रिसोड शहरासह तालुक्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सध्या मालेगावात पाच तर रिसोड शहरात कोरोनाचा एक रुग्ण आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे रिसोड ते मालेगाव या मार्गावरील बसफेऱ्यांमध्ये फारसे प्रवाशी नसल्याचे गत तीन दिवसात दिसून आले. केवळ तीन ते चार प्रवाशी घेऊन या बसेस तोट्यात धावत असल्याचे दिसून येते.(वार्ताहर)

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्याShirpur Jainशिरपूर जैनstate transportएसटी