शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

‘आनंद मेला’मध्ये कोरोनाविषयक नियमांचा फज्जा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 12:20 IST

Washim News ‘आनंद मेला’त कोरोनाविषयक नियमांची ऐशीतैशी होत असल्याचे शुक्रवार, २२ जानेवारी रोजी रात्री ८ ते १० या वेळेत दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत असून, मास्कचा वापर न करणाऱ्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जात आहे, तर दुसरीकडे स्थानिक जिल्हा क्रीडासंकुल येथे आयोजित ‘आनंद मेला’त कोरोनाविषयक नियमांची ऐशीतैशी होत असल्याचे शुक्रवार, २२ जानेवारी रोजी रात्री ८ ते १० या वेळेत दिसून आले. रस्त्यावर कोरोनाविषयक नियमाची अंमलबजावणी होत असताना, ‘आनंद मेला’त सवलत कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. देशात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली येत असून, कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहेत. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासंदर्भात शासन, प्रशासनातर्फे जनजागृती, वेळप्रसंगी दंडात्मक कारवाईदेखील केली जात आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले असले तरी कोरोनाविषयक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे केले जाते. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आहे. तसेच लग्नसमारंभात ५० पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी नाही. या सर्व नियमांना स्थानिक जिल्हा क्रीडासंकुल येथील ‘आनंद मेला’ अपवाद ठरत आहे. ‘आनंद मेला’त कोरोनाविषयक नियमांची अंमलबजावणी होते की नाही, यासंदर्भात २२ जानेवारी रोजी रात्री ८ ते १० या वेळेत रिअ‍ॅलिटी चेक केले असता, गंभीर बाबी समोर आल्या. प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझरची व्यवस्था आहे. आतमध्ये मात्र गर्दीचा उच्चांक दिसून आला. कोरोनाकाळातील हा गर्दीचा उच्चांक मानला जात आहे.अनेकजण मास्कचा वापर करीत नाहीत. तसेच फिजिकल डिस्टन्सिंग तर कुठेच आढळून आले नाही. यामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मास्कचा वापर केला नाही  तर दुचाकीचालकांना दंड ठोठावला जातो, मग ‘आनंद मेला’त या नियमांची अंमलबजावणी का नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. ‘नो मास्क, नो एन्ट्री’ नावालाच!आनंद मेला येथे ठिकठिकाणी ‘नो मास्क, नो एन्ट्री’ असे फलक लावण्यात आले आहेत. मात्र, याची अंमलबजावणी तेथे कार्यरत कामगारांकडून होत नसल्याचे दिसून आले. ‘नो मास्क, नो एन्ट्री’ असा फलक असलेल्या ठिकाणी कार्यरत कामगारच विनामास्क राहत असल्याने कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव झाला तर याला जबाबदार कोण? हा महत्वाचा प्रश्न आहे.

कोरोनाविषयक नियमांची अंमलबजावणी केली जाईल, या अटीवरच जिल्हा क्रीडासंकुल येथे ‘आनंद मेला’ला परवानगी दिली आहे. या अटी व नियमाचे उल्लंघन झाले तर परवानगी रद्द करण्यात येईल, अशा सूचनाही दिल्या. यासंदर्भात माहिती घेतली जाईल. - चंद्रकांत उप्पलवार जिल्हा क्रीडा अधिकारी, वाशिम

तहसील प्रशासनाकडून ‘आनंद मेला’साठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनाविषयक नियमांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. - विजय साळवेतहसीलदार, वाशिम

टॅग्स :washimवाशिमCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक