शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : कोरोनाचा एकही संशयित नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 11:36 IST

५ व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण कक्षात, ६ जणांना घरीच विलगीकरण करून निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही संशयित अथवा बाधित रुग्ण आढळलेला नाही. परदेशातून परत आलेल्या ३२ व्यक्तींपैकी ५ व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण कक्षात, ६ जणांना घरीच विलगीकरण करून निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. मात्र त्यांच्यामध्ये सुद्धा कोणतेही लक्षणे आढलेली नाहीत. उर्वरित २१ व्यक्तींचा १४ दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाला असून त्यांच्यामध्ये कोरोना विषाणू संसर्गाची कोणतीही लक्षणे आढळली नसल्याने त्यांना विलगीकरणाच्या बाहेर करण्यात आले.कोरोना विषाणू संसर्गाने संपूर्ण जग हादरले असून, खबरदारीचा उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ एप्रिलपर्यंत ‘लॉक-डाऊन’चे निर्देश दिले आहेत. त्याची वाशिम जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू असून, सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत नागरिकांना जागरूक केले जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३२ व्यक्ती परदेशातून परत आल्या आहेत. यापैकी ५ व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण कक्षात तर ६ जणांना घरीच विलगीकरण करून निगराणीखाली ठेवण्यात आले. उर्वरीत २१ जणांचा विलगीकरण कालावधी २८ मार्च रोजी पूर्ण झाला. कुणालाही कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत एकही संशयित अथवा बाधित रुग्ण आढळलेला नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.अद्याप कोरोना विषाणूचा एकही रूग्ण आढळला नसला तरी संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने संचारबंदी आदेश, जिल्हा बंदी आदेशाची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. शेजारील काही जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला संशयित रुग्ण आढळत असल्याने यापासून सावध होत २८ मार्चला जिल्हा बंदचे आदेश दिले. पुढील आदेशापर्यंत कोणत्याही व्यक्तीला जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही तसेच जिल्ह्यातील कोणताही व्यक्ती जिल्ह्याबाहेर जाणार नाही, या आदेशाची तंतोतंत अंमलबजावणी २९ मार्चपासून सुरू केली आहे तसेच यापूर्वी संचारबंदी काळात जीवनावश्यक वस्तूंची विक्री २४ तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. परंतू, संभाव्य धोका टाळण्यासाठी २९ मार्चपासून पुढील आदेशापर्यंत सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच जीवनावश्यक वस्तूंची विक्री सुरु केली जाणार आहे. रविवारी या आदेशाची अंमलबजावणी झाली.दक्षता बाळगाकोरोना विषाणू संसर्गाच्या संभाव्य धोक्यापासून सावधगिरी म्हणून प्रत्येक नागरिकानी स्वत:बरोबरच इतरांची काळजी घ्यावी, संचारबंदी आदेशाची अंमलबजावणी करावी, शक्यतोवर घराबाहेर पडू नये, स्वच्छता राखावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस