लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हयात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी तीन जणांचा मृत्यू तर ५८२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ४ मे रोजी पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २९५७४ वर पोहोचला आहे.जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासियांची चिंताही वाढली आहे. वाशिम शहरासह तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरवासियांनी आतातरी सतर्क होणे आवश्यक ठरत आहे. मंगळवारी प्राप्त अहवालानुसार आणखी तीन जणांचा मृत्यू झाला तसेच ५८२ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाशिम शहरातील ४२ आणि तालुक्यातील ७७ असे एकूण ११९, मालेगाव शहरातील २५ आणि तालुक्यातील ९७ असे एकूण १२२ , रिसोड शहरातील २३ आणि तालुक्यातील ५३ असे एकूण ७६, मंगरूळपीर शहरातील २३ आणि तालुक्यातील ९९ असे एकूण १२२, कारंजा शहरातील २० आणि तालुक्यातील ३० असे एकूण ५० आणि मानोरा शहरात ८ आणि तालुक्यात ५७ असे एकूण ६५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याबाहेरील २७ बाधिताची नोंद झाली असून ३२९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.(प्रतिनिधी)
Corona cases in Washim : आणखी तिघांचा मृत्यू; ५८२ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 11:32 IST