शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

Corona Cases in Washim : ४१ जणांची कोरोनावर मात; १७ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 18:05 IST

Corona Cases in wahim : ४१ जणांची कोरोनावर मात केली; १७ पॉझिटिव्ह आढळून आले.

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून बुधवार, २३ जून रोजी ४१ जणांनी कोरोनावर मात केली तर १७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४१,३०८ वर पोहोचला आहे. दरम्यान आणखी एका मृत्यूची नोंद सोमवारी घेण्यात आली.जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे आशादायी चित्र आहे. बुधवारी नव्याने १७ रुग्ण आढळून आले तर ४१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. कारंजा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. वाशिम तालुक्यात पाच, रिसोड तालुक्यात एक, मालेगाव तालुक्यात चार, मंगरूळपीर तालुक्यात चार, मानोरा तालुक्यात एक असे रुग्ण आढळून आले. आतापर्यंत ४१,३०८ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०३९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत ६१५ जणांचे मृत्यू झाले. जिल्ह्याबाहेरील २ बाधितांची नोंद झाली. कोरोनाचा आलेख खाली येत असला तरी धोका संपूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी यापुढेही आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने केले.

३०१ सक्रिय रुग्णबुधवारच्या अहवालानुसार नव्याने १७ रुग्ण आढळून आले तर ४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ३०१ रुग्ण सक्रिय आहेत. 

कारंजा तालुका निरंकबुधवारच्या अहवालानुसार कारंजा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. वाशिम शहरात दोन तर ग्रामीण भागात तीन, रिसोड तालुक्यात एक, मालेगावच्या ग्रामीण भागात चार, मंगरूळपीर शहरात दोन तर ग्रामीण भागात दोन आणि मानोराच्या ग्रामीण भागात एक रुग्ण आढळून आला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम