उंबर्डा बाजार येथे पथनाट्यातून कोरोनाविषयक जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:41 AM2021-01-25T04:41:32+5:302021-01-25T04:41:32+5:30

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ देवरे यांच्या हस्ते भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमात सामाजिक अंत, मास्कचा ...

Corona awareness through street play at Umbarda Bazaar | उंबर्डा बाजार येथे पथनाट्यातून कोरोनाविषयक जनजागृती

उंबर्डा बाजार येथे पथनाट्यातून कोरोनाविषयक जनजागृती

Next

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ देवरे यांच्या हस्ते भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमात सामाजिक अंत, मास्कचा वापर, हात स्वच्छ धुवावेत, मा‌झे कुटुंब माझी जबाबदारी, महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना, शिवभोजन थाली‌, गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, माझी कन्या भाग्यश्री, जननी सुरक्षा कन्यादान योजना, आंतरजातीय विवाह डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, राजर्षी शाहू महाराज महाराज गुणवत्ता पुरस्कार, मुख्यमंत्री स्वावलंबन योजना, प्रधानमंत्री मुद्रा लोन‌ अशा विविध योजनांची जनजागृती पथनाट्याच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

या कार्यक्रमात कलावंत शाहीर संतोष खडसे, शाहीर भगवान कांबळे, स्त्री अभिनय अमोल वानखेडे, साहेबराव पडघान, ढोलकी वादक गौतम जोंधळे, हार्मोनियम वादक संतोष कांबळे, विनोदी कलाकार गजानन खडसे, झांज वादक प्रकाश खडसे, झांजरी वादक आशिष खडसे, साथसंगतसाठी भगवान भगत, दिलीप कोल्हे सहभागी झाले होते. याप्रसंगी उपस्थित गावकऱ्यांना योजना व परिवर्तन घडीपत्रक पोस्टर वाटप करण्यात आले. उपस्थितांचे आभार व प्रार्थना घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाला ग्रामस्थांची उपस्थिती लक्षणीय होती.

Web Title: Corona awareness through street play at Umbarda Bazaar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.