शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळी नियंत्रणासाठी बाधित पाती, फुले, बोंडे कापा; कृषी विभागाचा सल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 18:06 IST

वाशिम : कपाशीच्या पिकावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी बोंडअळीने बाधित झालेले पाती, बोंडे आणि फुले तोडून टाकावी, असा सल्ला कृषी विभागाच्यावतीने देण्यात येत आहे.

ठळक मुद्देअमरावती विभागात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे.किडीवर नियंत्रणासाठी मार्गदर्शन सभा आणि फेरोमेन सापळे लावण्याचे आवाहन केले. कपाशी पिकातील बोंडअळी बाधित पाती, फुले आणि बोंडे तोडण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कपाशीच्या पिकावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यामुळे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. कीटकनाशकांचा आता या किडीवर काही परिणामही होत नसल्याचे दिसत आहे. आता यावर नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी बोंडअळीने बाधित झालेले पाती, बोंडे आणि फुले तोडून टाकावी, असा सल्ला कृषी विभागाच्यावतीने देण्यात येत आहे.अमरावती विभागात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कृषी विभागाच्यावतीने या किडीवर नियंत्रणासाठी मार्गदर्शन सभा आणि फेरोमेन सापळे लावण्याचे आवाहन केले. तथापि, या सर्व प्रयत्नानंतरही काहीच फायदा झाला नाही. गुलाबी बोंडअळीच्या जीवनचक्रातील घटक वातावरणात चार महिने टिकून राहतात, त्यामुळे एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे, वेळेवर पीक काढणे, कपाशीच्या हंगामापूर्वी आणि पीक कापणीनंतर शेतात स्वच्छता राखणे, कपाशीचे अवशेष अर्थात पºहाटी, गळलेली बोंडे दीर्घकाळ शेतात न ठेवणे, सतत कापूस न घेता पीक फेरपालट करणे, रासायनिक खतांचा आवश्यक तेनुसारच वापर करणे आदी बाबींची काळजी घ्यावी लागते; परंतु शेतकºयांकडून त्याची फारशी दखल घेण्यात येत नाही. यंदाही कपाशीवर या अळीचा प्रादुर्भाव आटोक्यावर बाहेर जात असल्याने कृषी विभागाकडून शेतशिवारांची पाहणी करून शेतकºयांना कपाशी पिकातील बोंडअळी बाधित पाती, फुले आणि बोंडे तोडण्याचा सल्ला देण्यात येत आहे.बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अभाव आणि पिकांची फेरपालट न केल्याने हा प्रकार यंदाही दिसत आहे. फेरोमेन सापळे कपाशीच्या पिकांत तांत्रिक पद्धतीने लावतानाच शेतकºयांनी बाधित झालेली बोंडे, पाती आणि फुले तोडून टाकावीत, असा आमचा सल्ला आहे.-दत्तात्रय गावसाने,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वाशिम.

 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीcottonकापूसFarmerशेतकरी