शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अडोळ प्रकल्पातील अवैध उपशावर नियंत्रण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 17:16 IST

रिसोड (वाशिम): तालुक्यातील ग्रामीण भागांत यंदा तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यानंतर शहराला पाणी पुरवठा करणाºया अडोळ प्रकल्पाची पातळीही झपाट्याने घटत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड (वाशिम): तालुक्यातील ग्रामीण भागांत यंदा तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यानंतर शहराला पाणी पुरवठा करणाºया अडोळ प्रकल्पाची पातळीही झपाट्याने घटत आहे. त्यामुळे शहरवासियांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भिती आहे. या पृष्ठभूमीवर रिसोडच्या तहसीलदारांनी शुक्रवारी या प्रकल्पाची पाहणी केली असून, या प्रकल्पातून अवैध उपसा होत असेल, तर त्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. रिसोड तालुक्यात गतवर्षी वार्षिक सरासरीच्या केवळ ८१.६८ टक्के पाऊस पडला. त्यात पावसाळ्यातील पावसाच्या खंडादरम्यान शेतकºयांनी प्रकल्पातील पाण्याच्या आधारे पिके जगविली, तर रब्बी हंगामातही मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा झाला. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश प्रकल्प हिवाळ्यातच कोरडे पडल्याने ग्रामीण भागांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आता शहराला पाणी पुरवठा करणाºया अडोळ प्रकल्पाची पातळीही झपाट्याने खालावत आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पात २५ टक्क्यांच्या जवळपास पाणीसाठा उरला आहे. त्यामुळे शहरवासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भिती निर्माण झाली आहे. या पृष्ठभूमीवर रिसोडचे तहसीलदार गणेश पांडे यांनी अडोळ प्रकल्पाला शुक्रवार १५ मार्च रोजी भेट देऊन पाहणी केली. पाटबंधारे विभागाच्या परवानगीशिवाय या प्रकल्पातून अवैध उपसा होणार नाही, याची दखल घेण्याच्या सुचना त्यांनी सहकारी अधिकारी व कर्मचाºयांना दिल्या असून, या प्रकल्पातून अवैध पाणी उपसा होत असल्याचे आढळून आल्यास पाटबंधारे विभागाला सुचीत करून संबंधितांना नोटीस देण्यात येतील, तसेच दखल न घेतल्यास मोटारपंप जप्त करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.  

 शहराला पाणी पुरवठा करणाºया अडोळ प्रकल्पातून अवैध उपसा होऊ नये, याची काळजी घेण्यात येत आहे. यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण प्रकल्पावरील मोटारपंपांची पाहणी करण्यात येणार असून, यात अवैध पाणी उपसा होत असल्याचे आढळल्यास तो तात्काळ बंद करण्यात येईल. -गणेश पांडे, मुख्याधिकारी, न.प. रिसोड

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प