शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अजेंडा नसलेली काँग्रेस सैरभैर झाली!; जावडेकरांची विरोधकांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 17:36 IST

केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्यावतीने देशभरातील जनतेसाठी विविध स्वरूपातील महत्वाकांक्षी योजना, उपक्रम राबविण्यात येत आहेत.

वाशिम : केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्यावतीने देशभरातील जनतेसाठी विविध स्वरूपातील महत्वाकांक्षी योजना, उपक्रम राबविण्यात येत आहेत. काँग्रेसकडे मात्र ठोस असे करण्यासारखे काहीच उरले नाही, कुठलाही महत्वपूर्ण अजेंडा नाही. त्यामुळे सैरभैर झालेली काँग्रेस विद्यमान भाजपा सरकारवर निरर्थक व बिनबुडाचे आरोप करीत सुटली आहे, अशी घणाघाती टीका केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी येथे शनिवार, २२ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केली.जिल्ह्यातील पाच ठिकाणी उभारण्यात आलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रांचे (हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस सेंटर) ना. जावडेकर यांच्याहस्ते आज उद्घाटन झाले. यादरम्यान दुपारी ३ वाजता वाशिममध्ये माजी आमदार अ‍ॅड. विजय जाधव यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांना संबोधित केले. पुढे बोलताना जावडेकर म्हणाले, की भाजपा सरकारने सर्वच पातळ्यांवर सर्वंकष विकास साधण्याकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशभरातील ११५ मागास जिल्ह्यांचा ‘अ‍ॅस्पिरेशनल डिस्ट्रीक्ट’ उपक्रमात समावेश करून संबंधित जिल्ह्यांमध्ये सर्व प्रकारच्या मुलभूत सुविधा पुरविण्यात येत आहेत. याशिवाय २३ सप्टेंबर रोजी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रांची (झारखंड) येथून देशभरातील ६०० पेक्षा अधिक जिल्ह्यांसाठी ‘आयुष्यमान भारत’ या आरोग्यविषयक योजनेची घोषणा करणार आहेत. याअंतर्गत १० कोटी ७० लाख कुटूंबांना दरवर्षी आरोग्यविषयक खर्चासाठी ५ लाख रुपयांपर्यंतच्या मदतीची तरतूद करण्यात आलेली आहे. एकूणच विद्यमान सरकार देशातील प्रत्येक नागरिकाचा फायदा डोळ्यासमोर ठेवून कार्य करित असताना काँग्रेस मात्र बिनबुडाचे आरोप करण्यात धन्यता मानत आहे. कधी पेट्रोल; तर कधी केरोसीन, राफेल घोटाळा झाल्याचे भासवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्यात कुठलेही तथ्य नसून आगामी २०१९ मध्येही जनता भाजपालाच स्पष्ट कौल देईन, असा विश्वास मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावेळी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला खासदार संजय धोत्रे, आमदार राजेंद्र पाटणी, माजी आमदार अ‍ॅड. विजय जाधव, पुरूषोत्तम राजगुरू आदिंची उपस्थिती होती.

टॅग्स :Prakash Javadekarप्रकाश जावडेकरwashimवाशिम