शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम शहरातील विस्कळीत वाहतूकीवर काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 12:53 IST

काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले असून या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून वाहतूक सुरळीत न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातील वाहतूक व्यवस्था अंत्यत विस्कळीत झालेली असून वाहतूक शाखेचे कर्मचारी शहरामध्ये कुठेही कर्तव्य बजावत नसून त्या उलट शहराच्या बाहेर पावत्या फाडण्याचे काम करीत आहेत. यावर काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले असून या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून वाहतूक सुरळीत न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.जिल्हाधिकारी यांना जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष दिलीपराव सरनाईक,  शहराध्यक्ष शंकर वानखडे यांच्या मार्गदर्शनात निवेदन सादर करण्यात आले, त्यानुसार शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी शहराबाहेर पावत्या फाडून फक्त वसुलीचे केंद्र बनले आहे की काय असा प्रश्न पडला आहे. शहरातील प्रमुख व वर्दळीच्या ठिकाणी एकही वाहतूक शाखेचा कर्मचारी आढळत नसल्याने शहरातील प्रमुख चौकामध्ये अस्ताव्यस्त वाहतूुकीचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.  अनेकदा या कारणावरुन वाद उदभवत आहेत. तसेच जड वाहतूक सुध्दा दिवसभर शहरामधून सर्रास होतांना दिसून येत आहे. सकाळी १०.३० ते ११.३० व संध्याकाळी ४.३० ते ५.३० ही वेळ कार्यालय व शाळांची वेळ आहे. यावेळी वाहतुकीबाबत सतर्कता पाळणे गरजेचे आहे. एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता वाशिम शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. या सर्व परिस्थितीला वाहतूक व्यवस्थेचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याचे  निवेदनात म्हटले आहे. यासंदर्भात योग्य निर्णय घेवून चौकशी करुन दोषिंवर कार्यवाही व वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदनावर राजु नामदेवराव वानखडे, समाधान माने, वाय.के. इंगोले, डॉ. विशाल सोमटकर, किसनराव मस्के, वाशिम पंचायत समितीचे सभापती गजाननराव भोने, प्रल्हादराव उलेमाले, दिपकराव भांदुर्गे, किशोर पेंढारकर, श्यामभाऊ उफाडे, अर्जुन उदगिरे, सुभाष देवहंस, नामदेव मापारी, प्रमोद भवाळकर, परशराम भोयर, शे.ख्वाजा शे.आगा, अ‍ॅड. अमोल सोमाणी, ईस्माईल इमाम नौरंगाबादी, संदीप वानखडे, रुपेश भोसले आदिंच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :washimवाशिमcongressकाँग्रेसTrafficवाहतूक कोंडी