गेल्या चार ते पाच वर्षांपासून धनज बु.-आंबोडा या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. आंबोडा येथून चार किमी अंतरावर धनज ही मुख्य बाजारपेठ असल्यामुळे गावातील नागरिकांना या रस्त्याने ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या या वाईट अवस्थेमुळे धनज येथून नियमित धावणारे ऑटोरिक्षाही बंद झाले आहेत. शाळकरी मुलांना रोज चार किमी अंतर पायदळ ये-जा करावी लागत आहे. हा रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी अनेकदा लोकप्रतिनिधींकडे केली. तथापि, या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. या रस्त्यामुळे होणारा त्रास दूर व्हावा यासाठी या रस्त्याचे काम त्वरित करावे, अशी मागणी आंबोडा येथील ग्रामस्थांकडून होत आहे.
===Photopath===
290121\29wsm_6_29012021_35.jpg
===Caption===
धनज बु-आंबोडा रस्त्याची अवस्था दयनीय