शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चालत्या- फिरत्या ब्लड बँकेचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 12:36 IST

नवीन वर्षानिमित्त ‘चालती फिरती ब्लड बँकेची निर्मिती केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : नववर्षाला प्रारंभ होण्यापूर्वी अनेकांनी नवनवे संकल्प केले आहेत. नववर्षाच्या पूर्वसंध्येला असाच एक संकल्प शहरातील विघ्नहर्ता फाउंडेशनने केला असून, नवीन वर्षानिमित्त ‘चालती फिरती ब्लड बँकेची निर्मिती केली जाणार आहे.रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. रक्ताचा पुरवठा हा रुग्णांना आवश्यक असणाऱ्या गरजेपेक्षा कितीतरी कमी आहे. अपुरा रक्त पुरवठा यामुळे अनेक जणांना आपले प्राणसुद्धा गमवावे लागतात. या समस्येचे निराकरण करण्यासाठी मालेगाव शहरांमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात ब्लड नेटवर्क तयार करण्यात येत आहे. १ जानेवारी रोजी मालेगाव शहरात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे . त्यामुळे कोणालाही रक्ताची गरज पडल्यास ताबडतोब रक्त उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे विघ्नहर्ता फाउंडेशनतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.रक्तदान करून त्याची सर्व माहिती ठेवून वेळेवर रक्तदाते पुरवण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात येणार आहे. रक्तदात्याची यादी तयार करून रक्तगटनिहाय यादी करून ती अद्यावत ठेवणे तसेच गरजूंना ताबडतोब रक्तपुरवठा करणे ही व्यवस्था यामार्फत मालेगाव शहरासह तालुक्यात केली जाणार आहे. रक्तपुरवठ्यासंदर्भातची माहिती अद्ययावत असली तर गरजू रुग्णांना ताबडतोब रक्तदान करणे, रक्तपुरवठा करणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे ब्लड बँक नेटवर्क उभारण्यात येत असल्याने विघ्नहर्ता फाऊंडेशनने स्पष्ट केले आहे. या उपक्रमाला मालेगाव शहरासह तालुक्यातील सर्व तरुण, नागरिकांनी सहकार्य करावे तसेच आपले नाव आणि रक्तगट नोंदणी करून गरजूंना मदत करण्याचे आवाहन विघ्नहर्ता फाऊंडेशनने केले आहे. पुरेशा प्रमाणात रक्ताचा साठा होण्यासाठी नियमित रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा संकल्पही या फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. रक्तदान शिबिर आयोजित करून रक्त गट नोंदणी करण्यात येणार आहे. १ जानेवारी रोजी रक्तदान शिबिर घेऊन या उपक्रमाचा शुभारंभ केला जाणार आहे. 

टॅग्स :washimवाशिमBlood Bankरक्तपेढी