शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला मंत्री व्हायचं नाही, तर..."; मंत्रिपदाच्या शर्यतीतून श्रीकांत शिंदेंची माघार?
2
...तर वंचित बहुजन आघाडी स्थापनेची गरजच पडली नसती; प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट
3
मोदी ३.० सरकारच्या कॅबिनेटचा फॉर्म्युला ठरला; महाराष्ट्रातून कुणाला मिळणार संधी?
4
Sonia Gandhi : सोनिया गांधी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा, खरगे यांचा प्रस्ताव मंजूर
5
भाजपाला २०१ जागांवर पराभूत करणारे 'ते' पक्ष कोणते?; काँग्रेसचा आकडा पाहून चकीत व्हाल
6
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातही भाजपच एक नंबरचा पक्ष, पण कसा? फडणवीसांनी सांगितलं...
7
Monsoon Update : महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी! मान्सून काही तासांत मुंबईत धडकणार
8
...तर INDIA आघाडीनं आणखी ९ जागा जिंकल्या असत्या; महाराष्ट्रातील ४ जागांचा समावेश
9
"एखादं मंत्रिपद मिळावं म्हणून शिंदे गटाची आदळआपट सुरु"; राजकीय भूकंपावरुन सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर
10
रोहित, विराट यांना मित्रच समज...! शाहीन आफ्रिदीला भारतीय चाहत्यांना प्रेमळ सल्ला, Video 
11
SBIच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या; एक्सपर्ट म्हणाले, "१००० च्या वर जाणार..."
12
चीनमधून एक बातमी आली अन् सोनं 'धडाम'...; गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढण्याची शक्यता!
13
"राज्यातला निकाल अनपेक्षित, पवारांनाही चार जागा येतील असं वाटत...." आशिष शेलार स्पष्टच बोलले
14
देवेंद्र फडणवीसांचा मित्रपक्षासह स्वपक्षातील नेत्यांना सल्ला; "आता ही वेळ जाहीरपणे..."
15
Flipkart पूर्वी PhonePe चा येणार आयपीओ, काय आहे प्लॅन; जाणून घ्या
16
'भिंतीवरचं पेंटिंग मिटवशील पण सत्य...?', दलजीत कौरने पुन्हा पतीवर साधला निशाणा
17
जोडी नंबर १! भाऊ-बहिणीची कमाल, होणार डेप्युटी कलेक्टर; सांगितला यशाचा 'सुवर्ण मंत्र'
18
"नितीश कुमारांना इंडिया आघाडीने दिलेली पंतप्रधानपदाची ऑफर"; JDU चा मोठा दावा
19
Dhananjay Munde : "मी व पंकजाताईंनी अत्यंत जिव्हारी लागणारा पराभव..."; धनंजय मुंडेंचं जिल्हावासीयांना आवाहन
20
Rahul Gandhi : 'राहुल गांधींना विरोधी पक्षनेते करा', काँग्रेस CWC बैठकीत ठराव मंजूर

एम.डी.पदवी बनावट असल्याची तक्रार; कारंजात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 2:21 AM

कारंजा लाड : कारंजा येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. नवल सारडा यांच्याकडे असलेली अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ सेशील येथून प्राप्त केलेली एम.डी.ची पदवी बनावट असल्याची तक्रार किरण क्षार यांनी कारंजा शहर पोलिसांत ५ डिसेंबरला केल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, सदर प्रकरण पोलिसांनी चौकशीत ठेवले आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी ठेवले प्रकरण चौकशीत 

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : कारंजा येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. नवल सारडा यांच्याकडे असलेली अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ सेशील येथून प्राप्त केलेली एम.डी.ची पदवी बनावट असल्याची तक्रार किरण क्षार यांनी कारंजा शहर पोलिसांत ५ डिसेंबरला केल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, सदर प्रकरण पोलिसांनी चौकशीत ठेवले आहे.तक्रारीनुसार, किरण क्षार व डॉ. मनोज काळे यांनी माहितीच्या अधिकारात कारंजा शहरातील काही डॉक्टरांच्या आय.एम.ए.ची प्रत व नोंदणी क्रमांक, पदवीविषयी ९ नोव्हेंबर रोजी कारंजा तालुका आरोग्य अधिकारी (पंचायत समिती) यांच्याकडे माहितीच्या अधिकारान्वये मागितली होती. यामध्ये शहरातील डॉ. नवल सारडा, डॉ.नीलेश खोतकर, डॉ. मिलिंद धांडे, डॉ. अजय कांत, डॉ. शादरुल डोणगावकर, डॉ. दिलीप धोपे, डॉ. पंकज काटोले या डॉक्टरांचा समावेश होता. तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार, डॉ. सारडा यांची एम.डी.ची पदवी देणारे युनिव्हर्सिटी ऑफ सेशील हे विद्यापीठ अस्तित्वात नसल्याचे तक्रारदाराने तक्रारीत नमूद केले. डॉ. सारडा आपल्या नावासमोर एम.डी. पदवी लिहून नागरिकांची दिशाभुल करीत आहेत, असा आरोप किरण क्षार यांनी तक्रारीत केला. तसेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने सदर अमेरिकन विद्यापीठाच्या एम. डी. पदवीला समकक्षता प्रदान करण्यात आली नसल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सदर तक्रार कारंजा शहर पोलिसांनी चौकशीत ठेवली आहे. या तक्रारीमुळे कारंजा शहरात एकच खळबळ उडाली.

मी कारंजा येथे मागील दहा वर्षांपासून बालरोगतज्ज्ञ म्हणून वैद्यकीय व्यवसाय करीत आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मुंबई आणि मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडून रितसर मान्यता मिळवून एम.बी.बी.एस, डी.सी.एच, एफ.सी.पी.एस या पात्रतेच्या आधारे बालरोग संदर्भात वैद्यकीय सेवा देत आहे. याशिवाय अतिरिक्त पात्रता म्हणून २00७ मध्ये अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ सेशीलची एम.डी. ची पदवी सर्व परीक्षा व प्रात्याक्षिके सदर युनिव्हर्सिटीकडे सादर करून ही पदवी मिळवली. या अतिरिक्त वैद्यकीय पात्रतेच्या आधारावर बालरोग तज्ज्ञ म्हणून मी काम करत नाही. जर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल यांनी सदर अतिरिक्त पदवीच्या नावासमोर उल्लेख टाळण्याची सूचना केल्यास त्या सूचनेचे पालन करण्यात येईल. - डॉ. नवल सारडा, कारंजा

डॉ. नवल सारडा यांची पदवी बनावट असल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे. या तक्रारीसंदर्भात महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडून अहवाल मागवून पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.  -एम.एम.बोडखे, ठाणेदार कारंजा

टॅग्स :docterडॉक्टरeducationशैक्षणिक