शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानभरपाईसाठी शेतक-यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधावा,  ४८ तासांची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 15:51 IST

सर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांना विम्याचे कवच मिळावे, यासाठी संबंधित शेतक-यांनी...

वाशिम - नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांना विम्याचे कवच मिळावे, यासाठी संबंधित शेतक-यांनी नॅशनल इन्शूरन्स कंपनीचे वाशिम जिल्ह्याचे प्रतिनिधी चंदन खोब्रागडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वाशिमचे तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगीरकर यांनी बुधवारी केले.

लहरी हवामान, नैसर्गिक आपत्ती आदींमुळे होणाºया पीक हाणीची भरपाई शेतकºयांना मिळावी यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना लागू केलेली आहे. या योजनेत पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आपत्ती, वीज, गारपीट, चक्रीवादळ, पुर व भुस्खलन, दुष्काळ, पाऊस खंड, किड व रोग, पेरणी व लावणी न झाल्याने होणा-या पिकाचे नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान इत्यादी बाबीचा विचार करुन जोखीमस्तर  ठरविण्यात येतो. रब्बी हंगामात गहू, हरभरा, करडई, रब्बी ज्वारी आदी पिकांचा विमा उतरविणा-या शेतक-यांना जोखीमस्तरानुसार भरपाई मिळणार आहे. त्यासाठी संबंधित शेतक-यांना ४८ तासांच्या आत विमा कंपनीशी संपर्क साधणे आवश्यक आहे. नॅशनल इन्शूरन्स कंपनीचे वाशिम जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून चंदन खोब्रागडे यांच्यावर जबाबदारी असून, संबंधित शेतकºयांनी खोब्रागडे यांच्याशी संपर्क साधणे आवश्यक आहे. ८४११८८६१७२ या क्रमांकावर एसएमएसद्वारे किंवा व्हॉटस्अ‍ॅपद्वारे विमा भरल्याची पावती टाकून ४८ तासाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले.

दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांनी रब्बी हंगामात पीक विमा उतरविला नसल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील केवळ सहा हजार ५०० शेतकºयांनी विमा उतरविला आहे. विमा कंपन्यांकडून लादलेल्या जाचक अटी, भरपाई मिळण्यास होणारा विलंब व दाद मागण्याची कोणतीही सोय नसल्यामुळे या योजनेकडे पाठ फिरविली असल्याचा दावा शेतकºयांनी केला. कर्जदार शेतकºयांना पीक विमा उतरविणे बंधनकारक असते. मात्र, वेळेवर कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याने बहुतांश शेतकºयांना रब्बी हंगामात पीक विमा उतरविता आला नाही तसेच रब्बी हंगामात पीककर्ज काढणाºया शेतकºयांची संख्याही खरिप हंगामाच्या तुलनेत अल्प असते. त्यामुळे पीक विमा उतरविण्यात कर्जदार शेतकºयांची संख्याही कमी आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी